Mumbai News, 12 Oct : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत त्यांनी आंदोलन न करण्याबाबत आपण कोणताही लेखी बाँड दिलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचेही जाहीर केले.
रविवारी (११ ऑक्टोबर) सकाळी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली कँट येथील कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर तिघांची सुटका करण्यात आली. शांतता आणि चांगले वर्तन राखण्याच्या अटीवर प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामीन बाँड सादर करण्यास त्यांना सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर अभिजीत दिपके दिल्लीहून मुंबईत परतले. यावेळी त्यांनी आपण आंदोलन करणारच असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच दिल्ली पोलिसांनी अजिबात माणुसकी दाखवली नाही. ते गुंड आहेत, त्यांच्याकडे माणुसकी नावाची गोष्टच नाही, असा आरोप दिपके यांनी केला.
यावेळी त्यांना पोलीस कारवाई आणि आंदोलनाबाबत विचारले असता, आम्ही कोणालाही काहीही लिहून दिलेले नाही. लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आजीचे निधन झाल्यामुळे आपण दिल्लीहून मुंबईत आल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच "प्रत्येकाला रस्त्यावर उतरावे लागणार आहे. कारण नरेंद्र मोदी हे हुकूमशाह आहेत आणि त्यांची हुकूमशाही संपवावी लागणार आहे. एका ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी संपूर्ण दिल्ली बंद करण्यात आली. मेट्रो बंद करण्यात आल्या आणि सर्व काही ठप्प करण्यात आले. गेल्या ७० ते ८० वर्षांच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते.
आम्हाला विमानातून ताब्यात घेण्यात आले. आम्ही काय दहशतवादी होतो का? असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदी यांनी अदाणी यांना देश विकला आहे. आता आंदोलन केले नाही, तर हा माणूस संपूर्ण देश विकून खाईल," अशा शब्दांत दिपके यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.