CJP Protest : दिल्लीत 40 हजार जवान तैनात करण्याची वेळ का आली? प्रशांत किशोर याचं मोठं वक्तव्य, म्हणाले "सरकार..."

Prashant Kishor on Delhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर (SIR) प्रश्न उपस्थित करत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Prashant Kishor | Delhi Protest | Gyanesh Kumar
Prashant Kishor | Delhi Protest | Gyanesh Kumarsarkaranama
Published on: 
Updated on: 

Delhi News, 11 Oct : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मोठे विधान केले आहे. आंदोलन रोखण्यासाठी सरकारला तब्बल ४० हजार निमलष्करी जवान रस्त्यावर तैनात करावे लागले, यावरूनच सरकार आंदोलनाला किती घाबरले आहे आणि आंदोलन किती शक्तिशाली आहे, हे स्पष्ट होते, असा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला.

आंदोलनात किती लोक सहभागी झाले, यापेक्षा आंदोलन रोखण्यासाठी सरकारने किती मोठा बंदोबस्त केला, हे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे जंतर-मंतरवरील आंदोलनाची आणि सरकारच्या भूमिकेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी संवाद साधताना या आंदोलनावर भाष्य केले.

ते म्हणाले की, रस्त्यावर ४० हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, ही बाबच आंदोलनाची ताकद दाखवून देते. आंदोलनस्थळी किती लोक पोहोचले, याची चर्चा केली जात आहे. मात्र, आंदोलन थांबवण्यासाठी सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करावे लागले, यावरून सरकार किती घाबरले आहे, हे दिसून येते. आंदोलन किती यशस्वी झाले, हे या बंदोबस्तावरूनच स्पष्ट होते, असे प्रशांत किशोर म्हणाले.

Prashant Kishor | Delhi Protest | Gyanesh Kumar
CEC Gyanesh Kumar news : ज्ञानेश कुमार यांचा पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील महत्वाचा कार्यक्रम रद्द; वाद सुरू असतानाच काय घडलं?

जंतर-मंतर आंदोलन नेमकं कशासाठी?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर (SIR) प्रश्न उपस्थित करत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी दिल्लीत येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Prashant Kishor | Delhi Protest | Gyanesh Kumar
Rahul Gandhi News: काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय, सर्व आमदार-खासदारांना तातडीनं दिल्लीत हजर राहण्याचे आदेश

मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात केली. जंतर-मंतरकडे जाणारे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे मिळून ४० हजारांहून अधिक जवान राजधानीत तैनात करण्यात आले होते. यामध्ये दिल्ली पोलिसांचे १५ हजारांहून अधिक कर्मचारी आणि केंद्रीय सुरक्षा दलांचे सुमारे २६ हजार जवान होते.

मेट्रो स्थानके बंद, इंटरनेट सेवांवरही निर्बंध

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जनजीवनावरही परिणाम झाला. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोच्या ४५ स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले होते. मध्य दिल्लीतील काही भागांत मोबाइल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली, तर जंतर-मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

आंदोलनाचे प्रमुख आयोजक आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह पक्षाचे काही प्रमुख नेते दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सौरव दास आणि आशुतोष रंका यांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. यामुळे आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com