Abhijeet Dipke Released : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांची सुटका करण्यात आली आहे. या तिघांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या तिघांना सकाळी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं होतं. यावेळी या तिघांची सूटका करण्याचे आदेश देण्यात आले. काल (ता.१०) सकाळी मुंबईहून दिल्लीला पोहोचल्यानंतर विमानातूनच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका ताब्यात घेतलं होतं.
ताब्यात घेतल्यानंतर १२ तास उलटूनही तिघांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप सीजेपीने केला होता. तसेच त्यांच्या वकिलांनाही माहिती देण्यास नकार दिल्याचे सीजेपीचे म्हणणे होते.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या स्थितीबाबत माहिती मागितली होती.
तिघांना नेमके कुठे ठेवण्यात आले आहे, त्यांना एकत्र ठेवले आहे की वेगवेगळ्या ठिकाणी, तसेच कोणत्या यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतले आहे, असे प्रश्नही सीजेपीने उपस्थित केले होते. अशातच आता दिल्ली पोलिसांनी तिघांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून या तिघांची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीजेपीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाची धार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.