Abhijeet Dipke 
देश

Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंचा मुळावर घाव! मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत देताना नियम अन् आमदार-खासदारांना विकत...

Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या आंदोलनाच्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत विचारणा करण्यात आली. यावर बोलताना त्यांनी सरकारला कडवट सवाल केला.

Amit Ujagare

Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या मागण्यांची पूर्तता झाल्या की नाहीत? हा अद्यापही सर्वासमोर मोठा प्रश्न आहे. कारण याबाबत केवळ शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेण्यात आलेला आहे. मात्र इतर दोन मागण्यांबाबत सरकारनं अद्याप कुठलीही स्पष्टता दिलेली नाही. उलट त्या मान्य होणारच नाहीत अशी सध्याची स्थिती दिसते आहे. यापार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी एएनआयला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना दिपके यांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळालं.

कसल्या व्यक्तीला शिक्षण मंत्री केलं?

दिपके म्हणाले, आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्यात असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण आमची जी मुख्य मागणी होती ती म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, ही मागणी त्यांनी पूर्ण केली आहे. पण त्यांच्याजागी कोणाला शिक्षण मंत्री बनलंय? प्रल्हाद जोशींना. जोशी हे अशी व्यक्ती आहेत ज्यांनी बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या गळ्यात हार टाकून त्यांनी स्वागत केलं होतं. यामुळं जी मुलं शाळेत आणि महाविद्यालयात शिकत आहेत त्यांना कसं वाटत असेल? त्यामुळं या नव्या नियुक्तीचं तर आम्ही समर्थन करतच नाही.

रात्रीतून सरकार पाडलं जातं

पण आमची दुसरी मागणी आम्ही केली होती ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. पण या संबंधित सर्व कुटुंबियांना पूर्णपणे नुकसान भरपाई अद्याप सरकारनं दिलेली नाही. पण काही बातम्यांनुसार कळतंय की सरकार म्हणतंय आधी आम्हाला नियम आणि अटी पाहाव्या लागतील. पण मला एक गोष्ट कळत नाही की, जिथं सरकार पाडायचं असतं तिथं रात्रीतूनच सरकार पाडलं जातं.

आमदार-खासदार विकत घ्यायला...

जिथं आमदार-खासदार विकत घ्यायचे असतात तिथं रात्रीतून करोडो रुपये खर्च करुन या आमदार-खासदारांना विकत घेतलं जातं. त्याठिकाणी तुम्हाला कुठलेही नियम व अटी दिसत नाहीत. पण जिथं पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचा विषय येतो, ती ही १ कोटी रुपयांची भरपाई आहे, तिथं तुम्हाला सगळे नियम व अटी लक्षात येतात. याचाच अर्थ तुमची नियत चांगली नाही. त्यामुळं मला वाटतं की अशा पद्धतीनं कारणं देण्यात येऊ नयेत, १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई त्या सर्व कुटुंबियांना देण्यात यावी जी कुटंब सध्या कर्जात बुडालेली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT