Contractors Agitation: सरकारच्या तिजोरीत खडखडाट! विकासकामांचा आतबट्ट्याचा खेळ सुरु; हजारो कोटींचं बिलं थकली, अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद

Contractors Agitation: सरकारच्या तिजोरीत खडखडाट! विकासकामांचा आतबट्ट्याचा खेळ सुरु; अर्थसंकल्पातील तरतुदींपेक्षा हजारो कोटींचं बिलं थकली
Public Development Work_File Photo
Public Development Work_File Photo
Published on
Updated on

Contractors Agitation: राज्यात शासकीस विकास कामांना आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण शासकीय ठेकेदारांची हजारो कोटी रुपयांची बिलं शासनं थकवलेली असल्यानं या ठेकेदारांनी आता सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळं सध्या सुरु असलेल्या कामांचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे. ठेकेदारांची ही थकलेली बिलं पाहिलं तर तुमचे डोळे फिरतील. पण शासनानं चालवलेला हा आतबट्ट्याचा कारभार नेमका कसा आहे? जाणून घ्या. साम टीव्ही न्यूजनं यासंदर्भात बातमी दिली आहे.

Public Development Work_File Photo
SET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटीनंतर 'सेट' परीक्षाही होती टार्गेटवर; तपासात धक्कादायक माहिती, परीक्षा व्यवस्थेत खळबळ

राज्यातील शासकीय ठेकेदारांनी शासनानं थकवलेल्या बिलांसाठी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. १८ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय ठेकेदारांचं तब्बल २० हजार कोटींहून अधिकची बिलं शासनानं थकवलेली आहेत. हजारो कोटींची बिल थकीत असल्यानं ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यापूर्वी अनेक ठेकेदारांनी या नैराश्येपोटी स्वतःचा जीव संपवल्याची उदाहरणं देखील आपल्यासमोर आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारी कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे उपाध्यक्ष किसन पानसरे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की, आदिवासी विभागातील रस्ते आणि पूल ही कामं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली.

डिसेंबर २०२४ अखेर १२ हजार कोटींची कामं पूर्ण झाली. त्यानंतर २०२४ - २०२५ मध्ये १३८० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद त्यामधून ९३१ कोटी रुपये ठेकेदारांना वाटप करण्यात आले. २०२५-२०२६ मध्ये फक्त २८० कोटी रुपये ठेकेदारांना वाटप केले गेले. २०२६-२०२७ अर्थसंकल्पीय तरतूद ८०० कोटी रुपये मात्र ठेकेदारांना थकीब बिलं अद्याप अदा केलेली नाहीत. आदिवासी विभागातील १० हजार कोटींची बिल थकीत आहेत.

Public Development Work_File Photo
Solapur Politic's : ‘त्यांना’ पुन्हा सोलापूर डीसीसी बॅंकेत येऊ देणार नाही : जयकुमार गोरेंचा इशारा कोणाकडे?

सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते, पूल आणि इमारती अशा कामांची २० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. जिल्हा परिषद, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांची १० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही काम ज्या ठेकेदारांकडून करुन घेतली जातात, असे राज्यात तब्बल ३० हजार ठेकेदार आहेत.

यामध्ये एकट्या नाशिक विभागात आदिवासी विभागाची २,१६२ कोटी थकबाकी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची २,००० कोटी रुपयांची थकबाकी आहे तर जलजीवन मिशनच्या कामांचे १,००० कोटी रुपये थकीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com