Sarkarnama
देश

TMC office attack : कोलकात्यात मोठा उद्रेक! जमावाकडून TMC कार्यालयात घुसून तोडफोड, थेट राष्ट्रपती अन् राज्यपालांना पत्र...

Kolkata Abhishek Banerjee TMC office attack BJP allegations : कोलकात्यातील TMC कार्यालयातील तोडफोडीवरून राजकीय वातावरण तापले. अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे धाव घेतली.

Rashmi Mane

TMC office attack in Kolkata : कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या हल्ल्यामागे भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कॅमक स्ट्रीटवरील TMC कार्यालयात गुरुवारी पहाटे हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अभिषेक बॅनर्जी यांच्या दाव्यानुसार, पहाटे सुमारे 4.30 वाजता शस्त्रांनी घेऊन आलेल्या काही गुंडांनी कोलकात्याच्या मध्यवर्ती भागातील पक्ष कार्यालयावर हल्ला केला. या वेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन हिसकावण्यात आले, फर्निचरची तोडफोड करण्यात आली, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान करण्यात आले आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली.

घटनेनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी कार्यालयातील नुकसानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी लिहिले, “आज सुबह-सुबह बीजेपी ने मेरे पार्टी ऑफिस का यह हाल किया है.” या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल

अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. वारंवार फोन आणि ईमेल करूनही जवळपास 2 तास पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला.

या घटनेनंतर त्यांनी राज्य सरकार, केंद्रीय गृह मंत्रालय आणि राजभवनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. "पश्चिम बंगालचे राज्यपाल कारवाई करतील का? केंद्रीय गृहमंत्री कारवाई करतील का? पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) कारवाई करेल का?” असा सवाल त्यांनी केला. तसेच कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य कायम ठेवण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

या घटनेवरून अभिषेक बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले, "मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेस आणि मला इतके का घाबरतात की तुम्हाला अशा धमक्यांचा आधार घ्यावा लागत आहे?" "ही लोकशाही नाही. ही राजकीय गुंडगिरी आहे," असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, All India Trinamool Congressने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांना पत्र पाठवून पक्षाच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली आहे. राज्यातील कथित राजकीय अराजकता आणि पोलिसांच्या कथित गैरवापराबाबत या भेटीत चर्चा करण्याची पक्षाची तयारी आहे. दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT