Schools Holiday : मोठी अपडेट! परभणी, लातूरमधील शाळांना सुट्टी; बीडसह 3 जिल्ह्यांत 'बंद'चा इशारा... नेमकं काय घडलंय?

schools holiday today Marathwada : परभणी आणि लातूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीडसह तीन जिल्ह्यांत बंदचा इशारा देण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या ताजी अपडेट.
Schools Holiday
Schools HolidaySarkarnama
Published on
Updated on

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज सहाव्या दिवशीही सुरू आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारकडून अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण मराठवाड्यात बंदची हाक देण्यात आली आहे.

परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड या प्रमुख जिल्ह्यांमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचे चौक, महामार्ग आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

Schools Holiday
Dilip Kamble: भाजप नेते, माजी मंत्र्याच्या वाहनांची तोडफोड; हल्ल्याआधी CCTVच्या वायरी कापल्या, पुण्यात नेमकं काय घडलं?

परभणी, लातूरमध्ये शाळा-महाविद्यालये बंद

परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या बंदला प्रतिसाद मिळत असून सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये आज शुकशुकाट दिसत आहे.

लातूर जिल्ह्यासह औसा, अहमदपूर आणि मुरुड परिसरातही बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शाळा-महाविद्यालयांसह प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प झाले असून आंदोलकांकडून रॅली काढण्यात येत आहे.

बीडमध्ये सर्वपक्षीय बंदची हाक

बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी बंदचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही सरकारकडून शिष्टमंडळ पाठवले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, लोहारा, उमरगा, भूम, परंडा, वाशी आणि कळंबसह विविध तालुक्यांमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Schools Holiday
Supriya Sule : अजितदादांच्या विमान अपघातावरून सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांच्या नेत्यांवर हल्लाबोल; म्हणाल्या, "आमचा भाऊ गेला अणि हे सत्ता..."

नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या तारखांना बंद

नांदेडमध्ये मात्र बंदच्या आवाहनावरून संभ्रम निर्माण झाला आहे. एका गटाने आज, 3 सप्टेंबर रोजी बंद आणि रास्ता रोकोची हाक दिली आहे, तर दुसऱ्या गटाने 4 सप्टेंबरला जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.

दरम्यान, कंधार येथे मराठा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणावर लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. प्रशासनाने मात्र आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com