TMC leader Abhishek Banerjee nominated to represent the party in an all-party delegation after Yusuf Pathan’s withdrawal.  sarkarnama
देश

Abhishek Banerjee : ...अखेर सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी 'TMC'कडून अभिषेक बॅनर्जींची निवड!

Trinamool Congress Party : याआधी टीएमसी खासदार युसूफ पठाण यांनी आपलं नाव या प्रतिनिधीमंडळातून मागे घेतलं होतं.

Mayur Ratnaparkhe

TMC Nominates Abhishek Banerjee for All-Party Delegation : ऑपरेशन सिंदूरची अनिवार्यता जगाला सांगणे आणि पाकिस्तानचा दहशतवादास असणारा कायमचा पाठिंबा, खोटारडेपणा उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सात सर्वपक्षीय संसदीय प्रतिनिधिमंडळास प्रमुख देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.  या दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी या प्रतिनिधिमंडळातून आपलं नाव परत घेतल्यानंतर, आता टीएमसीकडून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना या प्रतिनिधिमंडळात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वार सांगितले आहे की, आम्हाला हे सांगताना अतिशय आंद होत आहे की, आमच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी दहशतवादाविरोधता भारताची जागतिक स्तरावर भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळात तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींची निवड केली आहे.

अशावेळी जेव्हा जगाला दहशतवादाच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी एकजुट व्हायला पाहिजे, अभिषेक बॅनर्जींचे सहभागी होण्याने दृढनिश्चित आणि स्पष्टता दोन्ही मिळते. त्यांची उपस्थिती केवळ दहशतवादाविरोधात पश्चिम बंगालचा दृढनिश्चियच दर्शवणार नाही, तर जागतिक स्तरावर देशाचा सामूहिक आवाजही मजबूत करेल.

या दरम्यान तृणमूल काँग्रेसने आपले प्रतिनिधिमंडळ जम्मू-काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय प्रतिनिधिमंडळ श्रीनगर, पुंछ आणि राजौरी येथे जाईल व २१ ते १३ मे पर्यंत परिसरातच राहील. या काळात पक्ष पाकिस्तानच्या हल्ल्यातील प्रभावित लोकांसोबत एकजुटता दाखवेल आणि त्या कुटुंबीयांचीही भेट घेवून विचारपूस करेन, ज्यांनी आपले कौटुंबिक सदस्य गमावले आहे. या प्रतिनिधीमंडळात अन्य सदस्य डेरेक ओब्रायन, खासदार मोहम्मद नदीमुल हक, मानस रंजन भुतिया आणि खासदार सागरिका घोष असतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT