Operation Sindoor : पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी जायला युसूफ पठाणचा नकार; तीन शब्दात सांगितलं कारण

Yusuf Pathan Declines Foreign Delegation Role : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताने परदेशात खासदारांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. या शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचा देखील समावेश केला आहे.
TMC Yusuf Pathan
TMC Yusuf PathanSarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'करत भारताने पाकिस्तानला जगासमोर उघडं पाडलं आहे. अशातच आता पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताने अनेक देशांमध्ये खासदारांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये भाजप काँग्रेससह देशातील विविध पक्षांच्या नेत्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. याच शिष्टमंडळात केंद्र सरकारने तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा देखील समावेश केला आहे. मात्र, पठाण यांनी शिष्टमंडळसोबत जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

परदेशात जाण्यासाठी मी उपलब्ध नाही, असं पठाण यांनी केंद्र सरकारला कळवलं आहे. याबाबत तृणमूल काँग्रेसने रविवारी केंद्र सरकारला सांगितले की, जे शिष्टमंडळ दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी जगभरात जाणार आहे. त्या शिष्टमंडळामध्ये युसूफ पठाण किंवा पक्षाचा कोणताही खासदार समाविष्ट होणार नाही.

TMC Yusuf Pathan
Shashi Tharoor : केंद्राकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळात समावेश पण काँग्रेसने डावललं; शशी थरूर म्हणतात, "माझा अपमान..."

आमच्यासाठी देश सर्वप्रथम येतो आणि देशाच्या रक्षणासाठी आवश्यक असलेली कोणतीही कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आपल्या सशस्त्र दलांनी देशाला अभिमानास्पद कामगिरी बजावली असून यासाठी आपण नेहमीच त्यांचे ऋणी राहू. मात्र, परराष्ट्र धोरण पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे.

त्यामुळे आपले परराष्ट्र धोरण ठरवण्याची आणि त्याची संपूर्ण जबाबदारी फक्त केंद्र सरकारनेच घ्यायला पाहिजे. दरम्यान, भारताने पाकिस्तानला जगासमोर उघडं पाडण्यासाठी प्लॅन बनवला आहे. त्यासाठी जगभरातील प्रमुख देशांमध्ये केंद्र सरकार खासदारांचं शिष्टमंडळ पाठवणार आहे. या खासदारांच्या शिष्टमंडळात युसूफ पठाण यांचा देखील समावेश करण्यात आला होता.

TMC Yusuf Pathan
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'विरोधात पोस्ट करणं अंगलट; प्राध्यापकाला अटक तर विद्यार्थिनीचं कॉलेजमधून निलंबन

यासाठी सरकारने थेट पठाण यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यावर आपण परदेशात जाण्यासाठी उपलब्ध नसल्याचे कळवल्याची माहिती समोर आली आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.

त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने हे सर्व हल्ले उधळून लावले. त्यानंतर आता भारत जगभरात शिष्टमंडळे पाठवण्याची तयारी करत आहे. ज्याद्वारे पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघडकीस आणले जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com