Shatrughan Sinha
Shatrughan Sinha Sarkarnama
देश

खामोश! तृणमूलनं कधीच न जिंकलेल्या जागेवर तीन लाखांच्या मताधिक्यानं मोठा विजय

सरकारनामा ब्युरो

कोलकता : असनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Loksabha Election) तृणमूल काँग्रेसचे (TMC) उमेदवार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजपच्या (BJP) उमेदवार अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांचा तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. याचवेळी तृणमूलने कधीही न जिंकलेला मतदारसंघ जिंकून देण्याची कामगिरी त्यांनी केली आहे.

असनसोल हे पश्चिम बंगालमधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. ही लोकसभेची जागा आतापर्यंत कधीच तृणमूलला जिंकता आलेली नव्हती. आता पहिल्यांदाच ही जागा तृणमूलच्या पारड्यात पडली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना तृणमूलने मैदानात उतरवल्यानंतर आयात उमेदवार आहेत, अशा प्रचार भाजपने केला होता. त्यांच्या विरोधात बॉलीवूडमधील अग्निमित्रा पॉल यांना भाजपने रिंगणात उतरवले होते. शत्रुघ्न सिन्हा 6 लाख 56 हजार 358 मते मिळाली असून, तर पॉल यांना 3 लाख 53 हजार 149 मते मिळाली आहेत. तब्बल 3 लाख 3 हजार 209 मतांनी सिन्हांनी विजय मिळवला आहे.

अग्निमित्रा पॉल या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपट आणि कलाकारांसाठी फॅशन डिझायनिंग केलं आहे. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर वर्षभरातच म्हणजे 2020 मध्ये पक्षाने त्यांच्या भाजप महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्षाची जबाबदारी टाकली. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना असनसोल दक्षिण मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. त्यांनी तृणमूलच्या सयानी घोष यांचा पराभव केला होता. भाजपने त्यांना लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. बॉलीवूडचा भाग असलेल्या अग्निमित्रा यांचा शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी सामना झाला.

बंगालमधील एक लोकसभा व चार विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा आज निकाल लागत आहे. गायक व माजी खासदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्या राजीनाम्यामुळे असनसोल मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली होती. सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. ते 2014 व 2019 अशा दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. आता त्यांना बालीगंजमधून विधानसभा पोटनिवडणूक लढवली होती. त्यात सुप्रियो विजयी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT