भाजपला मोठा धक्का! पाच पोटनिवडणुकांत मिळाला भोपळा

एक लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात तृणमूल काँग्रेसने (TMC) एक लोकसभा आणि एक विधानसभेची जागा मिळवली आहे. काँग्रेसने (Congress) दोन विधानसभेच्या जागा मिळवल्या असून, राष्ट्रीय जनता दलाने (RJD) विधानसभेची एक जागा मिळवली आहे. याचवेळी भाजपला (BJP) भोपळा मिळाला आहे. (By-Election News Updates)

कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा काँग्रेस

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayashree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यश आले आहे.

बंगालमध्ये शत्रुघ्न सिन्हा अन् बाबुल सुप्रियोंची बाजी

असनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विजयाकडे वाटचाल केली आहे. त्यांनी भाजपच्या (BJP) उमेदवार अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांच्यावर तब्बल दोन लाखांनी आघाडी घेतली आहे. तृणमूलचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुप्रियो यांना 20 हजार 228 मतांनी विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार आहे. भाजप तिसऱ्या स्थानी तर काँग्रेसच्या चौथ्या स्थानी आहे.

BJP
उत्तरनंतर आणखी एका मतदारसंघात काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा भाजपला दे धक्का!

बिहारमध्ये तेजस्वी यादवांचा धक्का

बिहारमध्ये (Bihar) भाजप सत्तेत असून, विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (RJD) बोचहां मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. आरजेडीचे अमरकुमार पासवान हे विजय झाले असून, त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 36 हजार मतांनी विजय मिळवला आहे. दिवंगत आमदार मुसाफिर पासवान यांचे पुत्र अमरकुमार यांना तिकीट देण्याची खेळी आरजेडीने खेळली होती. त्यांना 82 हजार 562 मते मिळाली. याचवेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी मंत्री रमाई राम यांच्या कन्या गीता कुमारी यांना तिकीट दिले होते. त्यांना 45 हजार 909 मते मिळाली. पासवान यांनी कुमार यांचा तब्बल 36 हजार मतांनी पराभव केला आहे. सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनला दलाला आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

BJP
काँग्रेसवर नामुष्की! पोटनिवडणुकीतील उमेदवाराला 'नोटा'पेक्षाही कमी मते

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा विजय

छत्तीसगडमध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसनं विजयाकडे वाटचाल केली आहे. खैरागड मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार यशोदा वर्मा यांनी भाजपच्या कोमल जांघेल यांच्यावर 15 हजार 633 मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या अजून तीन फेऱ्या बाकी असून, वर्मा यांच्या विजय निश्चित मानला जात आहे. जनता काँग्रेसचे छत्तीसगड (जोगी) पक्षाचे आमदार देवव्रतसिंह यांच्या मृत्यूमुळे खैरागड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत भाजपच्या जांघेल या केवळ 870 मतांनी हरल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com