बांग्लादेशात 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर मोठी उलथापालथ झाली. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले. त्या सध्या भारतात आश्रयाला असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी आंदोलनादरम्यान त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी, हिंसा भडकवल्याप्रकरणी अंतरिम सरकारकडून अजूनही अटक सत्र सुरूच असून रविवारी एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली.
अभिनेत्री नुसरत फारिया हिला ढाका येतील विमानतळावर अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने एका चित्रपटात शेख हसीना यांची भूमिका केली होती. तेव्हापासून बांग्लादेशमध्ये नुसरत हिची ओळख शेख हसीना अशीच बनली होती. त्यामुळे पोलिसांनी तिला रविवारी अटक केल्यानंतर पुन्हा राजकीय वातावरण तापू लागले आहे.
नुसरतने 2023 मध्ये आलेले ‘मुजीब – द मेकिंग ऑफ ए नेशन’ या बायोपिकमध्ये शेख हसीना यांची भूमिका केली होती. बांग्लादेशातील वृत्तपत्र प्रोथोमच्या वृत्तानुसार, 31 वर्षांची नुसरत ढाका विमानतळावरून थायलंडला जाणार होती. काही दिवसांपूर्वी तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. तिच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
बायोपिकमध्ये प्रकाशझोतात आलेल्या नुसरतला त्यानंतर दोन वर्षांतच तुरुंगात जावे लागणार आहे. हा चित्रपट बांग्लादेश आणि भारताने एकत्रित प्रय़त्नातून तयार केला होता. दिवंगत भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दरम्यान, चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी नुसरत रेडिओ जॉकी म्हणून काम करायची. तिने 2015 मध्ये आशिकी – ट्रू लव या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते.
नुसरत यांनी बांग्लादेशप्रमाणे काही भारतीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. प्रामुख्याने बंगाली चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या बांग्लादेशात दुरचित्रवाणी निवेदन आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रातही सक्रीय आहेत. त्यामुळे या देशात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.