
Navi Delhi News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमधून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आता केंद्रीय गुप्तचर विभाग पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशातील हेरगिरांचा शोध घेत आहे. याआधी प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह 6 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची कसून चौकशी केली जातेय. तिचे सोशल मेडियावरील सर्व माहिती तापसली जातेय. अशावेळी हेरगिरीच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून आयबीच्या जाळ्यात आणखी एक महिला युट्युबर अडकली आहे. पुरी येथील युट्युबर प्रियंका सेनापती असे तिचे नाव असून आयबी आणि पुरीचे पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत.
हरियाणा हिस्सार येथील प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह 6 जणांना हिरगिरी प्रकरणात अटक करण्यात आलीय. या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली असनाच आयबीच्या तपासात ओडीशा कनेक्शन उघड झाले आहे. यानंतर आता आयबी आणि पुरीचे पोलीसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला असून प्रियंका सेनापतीला ताब्यात घेतले आहे.
ज्योती मल्होत्रा आपल्या व्लॉग्स आणि सोशल मीडिया कंटेन्टसाठी प्रसिद्ध होती. तिने भारतीय सैन्य दलाची ठिकाणं आणि इतर महत्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना (ISI) ला पुरवल्याचा ठपका आयबीने ठेवला आहे. तर यामागे सायबर-गुप्तहेरीचे नेटवर्क असल्याचाही संशय आयबीने व्यक्त केलाय.
ज्योती मल्होत्रा हिने सप्टेंबर 2024 मध्ये जगन्नाथ मंदिर आणि त्याच्या जवळील सरकारी परिसरातील मंदिराचे फोटो आणि व्हिडीओ काढले होते. ते तिने डिजिटल प्लॅटफॉर्म आधारे पाकिस्तानातील हस्तकांना पाठवले असल्याचा संशय गुप्तचर खात्याला आहे. त्याअनुशंगाने तपास यंत्रणा तपास करत असून ज्योती मल्होत्रा हिचे संबंध युट्युबर प्रियंका सेनापतीशी असल्याचे समोर आले आहे. आता या दोघांचा संबंध काय? या दोघी कशा एकत्र आल्या याबाबत तपास केला जातोय.
दरम्यान युट्युबर प्रियंका सेनापती यांनी याची माहिती मिळताच सोशल मीडियावर स्पष्टीकरण देताना आपली बाजू मांडली आहे. ज्योती मल्होत्रा हिच्याशी माझे कसलेही संबंध नसून तिची फक्त एक युट्युबर म्हणून ओखळ आहे. आम्ही फक्त व्यवसायिक मैत्रीण होतो. तिच्या व्यवहाराबद्दल मला कसलेही माहिती नव्हती. जर याची माहिती असती तर तिच्याशी मैत्री केलीच नसती. ती शत्रूला आपल्या देशाची माहिती देत असल्याचेही मला माहित नाही. मी तिला फक्त एक प्रोफेशनल कटेन्ट क्रिएटर म्हणूनच ओळखते. व्यक्तीगत पातळीवर तिच्याशी संबंध नाहीत. पण जेव्हा तिच्याबाबत बातम्या समोर आल्या त्यावेळी मी हादरले. आता पोलिस माझी चौकशी करत असून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करत असल्याचेही तिने म्हटलं आहे.
तर पोलिसांनी प्रियंकाच्या चौकशीनंतर आता पुरीत पोलिस बंदोबस्त वाढवला असून भुवनेश्वर आणि इतर पर्यटन स्थळांवर गस्त देखील वाढवली आहे. तसेच ड्रोन, डीएसएलआर आणि व्यावसायिक कॅमेऱ्याच्या मदतीने कंटेंट क्रिएटर्सवर बारीक नजर ठेवली जातेय.
या प्रकरणात युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्याशी युट्युबर प्रियंका सेनापती हिचे संबंध अशल्यावरून सध्या चौकशी केली जात आहे. पण प्रियंका सेनापती हिचे कोणत्याही प्रकारचे संबंध उघड झाल्यास याच प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. तर तपास यंत्रणा या दोघांतील संभाषण, सोशल मीडियावरील संवाद आणि डेटा शेअरिंग यांचा सखोल तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.