Adhir Ranjan Chowdhury Sarkarnama
देश

Adhir Ranjan Chowdhury : ममता बॅनर्जींशी लढायचं असेल तर आमच्याकडे या; काँग्रेसच्या चौधरींना भाजपची ऑफर!

Chetan Zadpe

West Bengal Political News : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात नेहमीच आक्रमक राहिले आहेत. यामुळे काँग्रेस पक्षात ते नेहमी एकटे पडलेले दिसून येतात. ममता बॅनर्जी आणि इतर टीएमसी नेत्यांकडून अधीररंजन चौधरी यांना 'भाजपचा एजंट' म्हणून वार केले जाते. (Latest Marathi News)

ममता बॅनर्जी यांनी नुकतेच जाहीर केले की, जर देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर टीएमसी त्यांना पाठिंबा देईल. टीएमसी प्रमुखांच्या या वक्तव्यावर अधीररंजन चौधरी म्हणाले, "ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवता येणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भाष्य केले आहे. ममता बॅनर्जी यांच्याबाबत जो काही निर्णय घेतला जाईल, ते स्वत: मी आणि नेत्या सोनिया गांधी घेतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खर्गे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने ही संधी साधली आणि बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी अधीर रंजन चौधरी यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. प्रचारादरम्यान एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुकांत मजुमदार म्हणाले, 'मी अधीर रंजन चौधरी यांना सांगतो की, तुम्हाला ममता बॅनर्जींशी लढायचे असेल तर योग्य जागा शोधा. तुम्ही ज्या घरात आहात ते घर ममतांशी लढू शकत नाही. त्यामुळे काँग्रेससोडून भाजपच्या घरात या, अशी ऑफर त्यांनी चौधरी यांना दिली.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, 'अधीर रंजन चौधरी निर्णय घेणार नाहीत, आम्ही निर्णय घेऊ, काँग्रेस पक्ष निर्णय घेईल. आम्ही हायकमांड आहोत. ममता बॅनर्जी सुरुवातीपासूनच बाहेरून पाठिंबा देत आले आहेत. बाहेरून पाठिंबा मिळणे ही नवीन गोष्ट नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT