India Aaghadi News : ..तर इंडिया आघाडीला पाठिंबा; ममता बॅनर्जींना झालेल्या उपरतीचा अन्वयार्थ !

Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा असून, सात टप्प्यांत मतदान होत आहे. पाचव्या टप्प्याचे मतादन तोंडावर असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. देशात इंडिया आघाडीची सत्ता आली तर बाहेरून पाठिंबा देणार, असे त्यांनी जाहीर केले आहे. मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचून मतविभागणी टाळण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न आहे.
India Aaghadi Mamata Banerjee
India Aaghadi Mamata BanerjeeSarkarnama

Mamata Banerjee news : लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने पश्चिम बंगाल हे देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेश (80), महाराष्ट्रापाठोपाठ (48) पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 22 आणि भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. 2014 मध्ये भाजपने केवळ दोन जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये त्यात 16 जागांची भर पडली. या निवडणुकीतही जागा वाढवण्यासाठी भाजपने प्रचंड जोर लावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडले आहे.

लोकसभेचे 42 मतदारसंघ असले तरी पश्चिम बंगालमध्ये साच टप्प्यांत निवडणूक होत आहे. चार टप्प्यांचे मतदान झाले असून उर्वरित तीन टप्प्यांत 24 जागांसाठी मतदान होणार आहे. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने जब बसवला. नंतर डाव्यांना उभारी घेता आलीच नाही. डाव्यापेक्षा आता तेथे भाजप पुढे गेला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. डाव्यांप्रमाणेच काँग्रेसचीही पश्चिम बंगालमध्ये दयनीय अवस्था आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीत आल्या नाहीत. तेथे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहेत. आता चार टप्प्यांचे मतदान झाल्यानंतर मात्र ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीची आठवण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

India Aaghadi Mamata Banerjee
Maharashtra Political News : इतके सारे होऊनही भाजप पुन्हा पवार, ठाकरे यांचे पक्ष फोडणार? 

निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीची सत्ता आली तर तृणमूल काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, असे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. इंडिया आघाडीत सहभागी होण्यास नकार देत स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी यांना चौथा टप्पा झाल्यानंतर अशी उपरती का झाली असावी, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्याचे उत्तर म्हटले तर साधे आहे, म्हटले तर अवघड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले होते, की मी कधीही हिंदू -मुस्लिम केले नाही. ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम असा भेद करीन त्या दिवसापासून मी सार्वजनिक जीवनात राहण्यास योग्य ठरणार नाही, असेही मोदी यांनी स्पष्ट केले होते. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मोदी यांच्या त्या स्पष्टीकरणाचा आता चौथ्या टप्प्यानंतर मुस्लिम मतदारांवर किती प्रभाव पडेस, हे सांगता येणार नाही, मात्र ममता बॅनर्जी यांनी मात्र सावध पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

मी हिंदू-मुस्लिम करत नाही, असे एकीकडे मोदी सांगत होते त्यावेळी तिकडे पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वेगळेच सांगत होते. ममता दीदी यांनी मुल्ला, मौलवींना मानधन सुरू केले आहे, हे तुम्हाला मान्य आहे का, असे एका जाहीर सभेसाठी जमलेल्या लोकांना ते विचारत होते. आता अमित शाह खरे की नरेंद्र मोदी खरे, यावर वेगळी चर्चा होऊ शकते. ममत बॅनर्जी यांची चिंता वेगळीच आहे. मुस्लिम मतदार एकवटला आहे आणि तो काँग्रेसच्या मागे जात असावा, असे ममता बॅनर्जी यांना वाटत असेल. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढत आहे. त्यामुळे तेथील मतदार काँग्रेसच्या मागे जाईल आणि मतविभागणीचा फटका आपल्या पक्षाला बसेल, अशी चिंता त्यांचा सतावत असेल. मुस्लिम मतदार तृणमूलच्या पाठीमागे यावा, यासाठी देशात इंडिया आघाडीची सत्ता आली तर तृणमूल बाहेरून पाठिंबा देणार, असे त्यांना जाहीर करून टाकले आहे.

India Aaghadi Mamata Banerjee
Eknath Shinde Bag Check : राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची हेलीपॅडवर कसून तपासणी!

पश्चिम बंगाालमध्ये 24 जागांवर पुढील तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. भाजपने (BJP) तेथे प्रचंड जोर लावला आहे. संदेशखाली प्रकरण भाजपने उचलून धरले होते, मात्र ते नंतर त्यांच्यावरच बूमरँग झाल्याचे सांगितले जात आहे.पश्चिम बंगलामधील 13 जागांवर मुस्लिम मतदार परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत अमित शाह यांनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार काँग्रेसच्या मागे जाईल का, अशी चिंता ममता बॅनर्जी यांना लागलेली असेल. तो मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

India Aaghadi Mamata Banerjee
Lok Sabha election 2024 : धंगेकर 40 हजार, तर सुळे अन् कोल्हेंचा अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय! जगतापांना कॉन्फिडन्स...

ममता बॅनर्जी आणि भाजप एकमेकांना टोकाचा विरोध करतात. त्यामुळे भाजपची सत्ता आली तरी तो विरोध कायम राहणारच आहे. इंडिया आघाडीची सत्ता आलीच तर तेथेही अशीच परिस्थिती राहू नये, म्हणजे विरोध राहू नये, असा प्रयत्न ममता बॅनर्जी यांचा आहे. त्यामुळे त्यांना आता उपरती झाली असून, इंडिया आघाडीची सत्ता आली तर बाहेरून पाठिंबा देऊ, असे त्यांनी जाहीर केले आहे. तृणमूल काँग्रेस निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, हेही त्यांनी याद्वारे स्पष्ट केले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

India Aaghadi Mamata Banerjee
Maratha Reservation Politics : सकल मराठा समाजाचा वाजेंना पाठिंबा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com