Congress Taunt to Mamata Banerjee Sarkarnama
देश

Congress Taunt to Mamata Banerjee : ''पोटनिवडणुका जिंकल्याने कुणी पंतप्रधान होत नसतं'' ; काँग्रेसच्या 'या' नेत्याचा ममता बॅनर्जींना टोला!

Trinamool Congress MP Kalyan Banerjee on Congress : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेते पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रऐेसकडून प्रत्युत्तर आले आहे.

Mayur Ratnaparkhe

Adhiraranjan Chaudhary on TMC News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मानहानीकारक पराभवानंतर आता विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित होत आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी इंडिया आघाडीच्या नेतृत्वातील बदलाबाबत वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांचे विधान समोर आले आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसवर पलटवार करत म्हटले की, सहा जागा जिंकून जर कुणाला वाटत असेल, की मी पंतप्रधान बनेन तर हे केवळ स्वप्नच ठरेल.

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसवर पलटवार केला आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींबाबत म्हटले की, अखेर कल्याण बॅनर्जी कोणत्या अधिकाराने हे म्हणत आहेत, की ममता बॅनर्जींच्या हाती इंडिया आघाडीची धुरा सोपवावी.

तसेच, तृणमूल काँग्रेस(TMC) खासदार आधी राष्ट्रीय पक्ष होता. परंतु आता प्रादेशिक पक्ष बनून राहिला आहे. त्या पक्षाचे सातत्याने घसरण होत आहे. राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्यावतीने प्रत्येक निवडणुकीत प्रयत्न केला गेला. परंतु हा पक्ष सगळीकडे फिरून थकल्यानंतर पश्चिम बंगालपर्यंतच मर्यादित राहिला. विहिरीमधील बेडकाला आकाशही विहिरीच्या आकाराचेच दिसते. तृणमूल काँग्रेस आणि कल्याण बॅनर्जींची परिस्थितीही अशीच काहीशी आहे. असा टोलाही लगावला.

याशिवाय अधीररंजन चौधरी(Adhiraranjan Chaudhary) यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्ला करत म्हटले की, ते केवळ पश्चिम बंगालपर्यंतच मर्यादित आहेत. पश्चिम बंगालमध्ये त्यांचा राज आहे. तेथे गावागावात त्यांच्या पक्षासोबतच त्यांची गुडंगिरी आणि टवाळखोरी आहे. पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीच्या आधीच सर्वांना माहिती होते की, येथे तृणमूल काँग्रेसच निवडणूक जिंकणार आहे. त्यांनी पुढे म्हटले की, जर कोणी विचार करत असेल मी काही पोटनिवडणुकांमध्ये विजय मिळवून देशाचे पंतप्रधान होईल, तर ही केवळ एक कल्पना ठरू शकते. जर ममता बॅनर्जींचे स्वत:चे हे स्वप्न असेल, तर त्या स्वत: का नाही सांगत, की त्या इंडिया आघाडीच्या नेता बनतील.

कल्याण बॅनर्जी नेमकं काय म्हणाले? -

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काँग्रेस(Congress) नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी मंगळवारी म्हटले होते की, महाराष्ट्रात मला काँग्रेसकडून बरीच अपेक्षा होती. परंतु पक्ष अपेक्षेनुसार विजय मिळवता आलेला नाही. कल्याण बॅनर्जींनी हेही म्हटले की इंडिया आघाडीला मजबूत करण्यासाठी एका नेत्याची आवश्यकता आहे. भाजपशी लढण्यासाठी आघाडी भक्कम असणे आवश्यक आहे. खासदार कल्याण बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीच्या नेत्या बनवण्याचेही म्हटले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT