
Chandrashekhar Bawankule Press Conference: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत, मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्वन जो निर्णय घेईल त्यास माझं आणि शिवसेनेचं समर्थन असेल असं जाहीर केलं. यामुळे एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग आता सुकर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भाजपनेही पत्रकारपरिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या भूमिकेबद्दल जाहीर कौतुक करत आभार व्यक्त केले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, 'महायुतीचे आमचे नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. कालपासून विरोधी पक्षाचे लोक एकनाथ शिंदेंबाबत हे नाराज आहेत, ते महायुतीवर नाराज आहेत अशा वेगवेगळ्या वावड्या उठवत होते.
एकनाथ शिंदेंसारख्या अत्यंत कर्तबगार व्यक्तिबाबत, त्यांच्या व्यक्तिमत्वावर विरोधी पक्षाच्या महविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. परंतु आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या, देशाच्या जनतेला पत्रकारपरिषदेच्या माध्य्मातून आपली भूमिका स्पष्ट केली.'
तसेच 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आमचं केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय मुख्यमंत्रिपदाबाबत करतील, त्या निर्णयाला पूर्ण समर्थन एकनाथ शिंदे यांचं राहील आणि शिवसेनेचंही राहील. या पद्धतीची त्यांनी महायुती म्हणून जी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली. आणि विरोधी पक्षांच्या ज्या काही तोंडाच्या वाफा सुरू होत्या, त्या वाफा वाफाच राहिल्या.' असं म्हणत विरोधी पक्षांना टोलाही लगावला.
याशिवाय 'ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी काम केलं आहे. खरंतर आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदे यांचं काम बघतो आहोत. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असतानाही एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून समृद्धी महामार्ग पूर्ण केला.' असं बावनकुळेंनी सांगितलं.
याचबरोबर 'उद्धव ठाकरेंनी भाजपला (BJP) धोका दिला, हे एकनाथ शिंदे यांना न पटल्यामुळे हिंदुत्वाची भूमिका घेवून, हिंदुहृयसम्राट यांच्या विचाराला पुढे नेत पुन्हा या महाराष्ट्रात शिवशाहीचं सरकार आणण्यासाठी मोठी भूमिका घेतली. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांनी या महाराष्ट्राला विकासित राज्य करण्यासाठी मोदींच्या नेतृत्वात काम सुरू केलं. आमचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून आणि मग अजित पवारांची साथ घेवून या महाराष्ट्रला डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम केलं.' अशा शब्दांत बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं.
(Edited by - Mayur Ratnapakhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.