Aditya Thackeray Meet With K T Rama Rao : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे तेलंगणाच्या दौऱ्यावरती आहेत. आदित्य ठाकरे तेलंगण सरकारमधील मंत्री के टी रामाराव यांची भेट घेतली आहे. रामाराव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र आहेत. तेलंगण सरकारमधील अनेक खाती हे के टी रामाराव सांभाळतात. आज आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली आहे.
आदित्य ठाकरे तेलंगणाच्या दौऱ्यावरती आहेत. महाराष्ट्राप्रमाणे देशातही भाजपविरोधात मजबूत आघाडी व्हावी, या भूमिकेतून ठाकरेंचे पावलं पडत आहेत, असे दिसून येत आहे. शिवसेनेतल्या बंडाळीनंतर शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा ताकदीने उभा राहावा, यासाठी ठाकरे गट सर्व ताकद पणाला लावत आहे. हेच काम आदित्य ठाकरे करताना दिसत आहेत.
यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री व राजदचे सर्वेसेवा तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) यांची भेट घेतली होती. आगामी काळात समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची ही ते भेट घेणार आहेत. त्यामुळे भाजपविरोधात जबरदस्त आघाडी उघडण्यासाठी आदित्य ठाकरे अॅक्शन मोडवर असलेले दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.