Pune News : पुणेकरांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचं प्रभू रामांना साकडं; आरती करून सरकारचा विरोध करणार !

Congress In Ram Mandir : कर सवलत आणि व्याजाच्या कपातीसाठी काँग्रेस मैदानात..
Congress Pune
Congress Pune Sarkarnama
Published on
Updated on

Pune Congress : पुणे काँग्रेसच्या वतीने आता रामाच्या आरतीतून या राज्य सरकारला विरोध करण्यासाठी काँग्रेसने साकडं आंदोवल पुकारले आहे. पुणेकर (PUne News) नागरिकांसाठी महत्त्वाचा असणारा मुद्दा म्हणजे ४० टक्के घरपट्टी कर सवलत आणि सावकारी व्याजात कपात या दोन मुद्द्यावरून पुणे काँग्रेसने राज्य सरकारला घेरण्याची योजना आखली आहे.

Congress Pune
Salman Khan Death Threat : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून मोठी कारवाई

४० टक्के घरपट्टी कर सवलत आणि सावकारी व्याजात कपात असे मुद्दे समोर काँग्रेस प्रतीकात्मक आंदोलन पुकारणार आहे. पुण्यातील तुळशीबोगत असणाऱ्या राम मंदिरात ही आरती करण्यात येणार आहे. बुधवारी १२ एप्रिल रोजी, सकाळी १०.०० वाजता ही आरती करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी संजय बालगुडे यांच्या नेतृवाखाली हे प्रतिकात्मक आंदोलन पार पडणार आहे. या आंदोलनात पुणेकर नागरिकांनाही उपस्थित राहण्याचे, आवाहन करण्यात आलेले आहे. यामुळे आता आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्षांमध्ये सक्रियता वाढली आहे.

Congress Pune
Threat to CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात !

काय आहे ४० टक्के कर सवलत?

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशीही मागणी होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com