Kolkata doctor murder case Sarkarnama
देश

Kolkata rape case update : अखेर कोलकात्याच्या ‘निर्भया’ला न्याय मिळाला; आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी

Sanjay Roy convicted RG Kar rape case : सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत होता. त्याचे हेडफोनही घटनास्थळी सापडले. सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे की संजय राय हा मुख्य आरोपी आहे.

Rashmi Mane

Sanjay Roy guilty RG Kar case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला अखेर दोषी ठरवलं आहे. संजय रॉयला सियालदाह सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. गेल्या वर्षी 9 ऑगस्टला आरजी कार रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमधून पीडितेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी, नागरी स्वयंसेवक संजय राय याला अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत होता. त्याचे हेडफोनही घटनास्थळी सापडले. सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे की संजय राॅय हा मुख्य आरोपी आहे.

न्यायालय २० जानेवारीला संजय रॉयला शिक्षा सुनावणार आहे.

सियालदाह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. न्यायालय २० जानेवारीला संजय रॉयला शिक्षा सुनावणार आहे. खटला सुरू झाल्यानंतर ५७ दिवसांनी या प्रकरणाचा निकाल जाहीर केला जाईल. या प्रकरणाची सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या घटनेचा तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणात आधीच आरोपपत्र दाखल केले आहे.

सियालदाह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी हा निकाल दिला. आरोपीला दोषी ठरवताना न्यायाधीशांनी म्हटले, 'तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे.' न्यायाधीश अनिर्बान दास यांनी संजॉय रॉयला भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (बलात्काराची शिक्षा), ६६ (मृत्यूला कारणीभूत ठरविण्याची शिक्षा) आणि १०३ (खून) अंतर्गत दोषी ठरवले.

दरम्यान, पीडितेच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले आहे की या घटनेत एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असू शकतो. गुन्ह्यात सहभागी असलेले इतर लोक मोकाट फिरत असल्याने तपास अर्धवट असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणेने मुख्य आरोपी संजय रायला मृत्युदंडाची मागणी केली आहे. त्याने न्यायालयाला असेही सांगितले की राय हा या गुन्ह्याचा एकमेव दोषी आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आणि शेकडो लोकांनी, प्रामुख्याने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी, दीर्घकाळ निदर्शने केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT