मणिपूर : एनडीए म्हणजेच भारतीय जनता पक्षप्रणीत नॅशनल डेमोक्रेटिक अलायंस मधून नीतीश कुमारांचा जनता दल यूनायटेड (JDU) बाहेर झाली आहे. आता मणिपूर राज्यातही जदयू पक्ष भाजपची साथ सोडणार आहे. ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपसोबत सामील असलेल्या सरकारमधून जदयू आपले समर्थन काढून घेणार आहे. अजूनही हा निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र लवकरच जदयूकडून हा निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)
आज (३० आॅगस्ट) मणिपुर जदयूचे अध्यक्ष केएसएच बीरेन सिंह म्हणाले, आम्ही सरकारमधून समर्थन काढून घेण्याबाबत विचार करत आहोत. ३ आणि ४ सप्टेंबरला बिहारच्या राजधानीत पटना येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत ते पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची गाठभेट घेणार आहेत. 'आम्ही २ सप्टेंबरला पटना दौऱ्यावर निघणार आहोत, पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत सामील होणार आहोत,' अशी माहिती बीरेन सिंह यांनी दिली.
राज्यात मागील विधानसभा निवडणूकीत भाजपला ३२ जागा, स्थानिक नॅशनल पीपल्स पार्टीला ७ जागा आणि त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून जदयूला ६ जागा मिळाल्या आहेत. यानंतर जदयूने भाजपला समर्थन देऊन सरकार स्थापन केले होते. या दरम्यान कांग्रेस और नागा पीपल्स फ्रंट यांना ५-५ जागा मिळाल्या होत्या. कुकी पीपल्स आघाडीला २ जागा, तर ३ जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. सद्यस्थितीत भाजपकडे जदयूच्या ६ आमदारांसह ५५ आमदारांचे समर्थन आहे.
केएच जॉयकिशन, गुरसंगलुर सनाते, मोहम्मद अब्दुल नासिर, मोहम्मद अशबु्द्दीन, एलएम खोटे आणि टीएच अरुणकुमार हे सहा जण जदयूचे आमदार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.