NCP-Shivsena-Congress
NCP-Shivsena-Congress Sarkarnama
देश

कॉंग्रेससह राष्ट्रवादीचाही शिवसेनेला धक्का; राऊतांच्या घोषणेला केराची टोपली

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचे (Goa assembly election) बिगुल वाजले असून ती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर दुसऱ्या बाजूला गोव्यात युती - आघाडीच्या राजकाणानेही वेग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपुर्वी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी (shivsena-ncp alliance) एकत्र लढणार असल्याचे सांगितले. तसेच या आघाडीत त्यांनी काँग्रेसलाही (Congress) आमंत्रित केले होते. मात्र संजय राऊत यांच्या या आवाहनाला कॉंग्रेसने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर कॉंग्रेस पाठोपाठ आता खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज संजय राऊत यांच्या घोषणेला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात आता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून आम्ही किमान १० जागा लढवू अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप यांनी दिली आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना एकटी पडल्याचे चित्र आहे.

दक्षिण गोव्यात (South Goa) आम्ही नुवे, बाणावली, नावेली, दाबोळी आणि वास्को या ५ जागेवर उमेदवार उभे करणार असून उत्तर गोव्यातून आणखी ५ जागा लढवू असे जुझे फिलिप यांनी स्पष्ट केले. त्यानुसार दाबोळी येथून डिसोझा स्वतः रिंगणात उतरणार असून नुवेतून लिंडन मोंतेरो याना उमेदवार म्हणून निवडणूकीत उतरवण्याची तयारी चालू आहे. बाणावलीत तृणमुलने उमेदवारी नाकारलेले टोनी डायस हे राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात.

दरम्यान काँग्रेसने दोन दिवसांपुर्वी त्यांची विधानसभा उमेदवारांची ७ नावांची दुसरी यादी जाहिर केली. त्यापुर्वी काँग्रेसने पहिल्या यादीत ८ जागांवरील आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची स्वतंत्ररित्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसने आता विधानसभेतील ४० जागांपैकी १६ जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. या सोबतच काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाशीही युती केली आहे. त्यामुळे काही जागा गोवा फॉरवर्डसाठीही सोडाव्या लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस आता शिवसेना आघाडीसोबत करण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीने देखील त्यांची शिवसेनेसोबत आघाडी न करण्याची भुमिका स्पष्ट केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT