विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मायावती उतरणार नाहीत

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections) बिगुल वाजला आहे.
Mayawati
Mayawati Sarkarnama
Published on
Updated on

लखनौ : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections) बिगुल वाजला आहे. यानंतर देशातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यात सर्वाचे लक्ष उत्तर प्रदेशकडे (Uttar Pradesh) लागले आहे. असे असताना आता बहुजन समाज पक्षाच्या (BSP) अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.

मायावती या निवडणूक लढणार नसल्याची घोषणा बसपचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी दिली. मिश्रा यांनी म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढणार नाही. याआधी मायावतींनी कधीही विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. समाजवादी पक्षाकडे त्यांचे 400 उमेदवार नसताना ते 400 जागा कशा जिंकू शकतील? राज्यात भाजप आणि समाजवादी पक्ष नव्हे तर बसपचे सरकार येणार आहे.

Mayawati
परमबीरसिंहांना यापुढे कोणतेही संरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा दणका

दरम्यान, एबीपी न्यूज आणि सी व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजप (BJP) उत्तर प्रदेशात सत्ता कायम ठेवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला 100 जागांचे नुकसान होण्याची शक्यताही वर्तवली आहे. समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) 100 जागांचा फायदा होईल आणि काँग्रेसला (Congress) केवळ 3 ते 7 जागा मिळतील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

Mayawati
मोठी बातमी : सांस्कृतिक मंत्री आज भाजपमध्ये प्रवेश करणार

उत्तर प्रदेशमध्ये मध्ये 2017 ला भाजपला 325 जागा मिळाल्या होत्या. आता एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणात भाजपला 223 ते 235 जागा मिळतील, असे म्हटले आहे. समाजवादी पक्षाला 145 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल, असे म्हटले आहे. सध्यातरी उत्तर प्रदेशची निवडणूक ही भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशीच असणार असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com