Malvika Sood
Malvika Sood Sarkarnama
देश

सोनू सूदच्या बहिणीला तिकिट मिळताच काँग्रेस आमदार थेट भाजपमध्ये दाखल

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये (Punjab) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने (Congress) 86 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) भगिनी मालविका सूद (Malvika Sood) यांना मोगा मतदारसंघातून तिकिट देण्यात आले आहे. मात्र, यामुळे नाराज काँग्रेस आमदाराने थेट भाजपचा (BJP) रस्ता धरला आहे.

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या बहिणीने 10 जानेवारीला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर पाचच दिवसांत त्यांना काँग्रेसने तिकिट दिले आहे. त्यांना मोगामधून तिकिट मिळताचे तेथील विद्यमान आमदार हरजोत कमल यांनी बंड केले आहे. त्यांनी थेट भाजपचा रस्ता धरला आहे. काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर होताच काही तासांतच त्यांनी भाजप कार्यालय गाठले. तेथे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशही झाला.

मागील वर्षीच सोनू सूद यांनी बहीण मालविका सूद या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं होतं. पण त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. मालविका या काँग्रेस किंवा आपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्या उपस्थितीत त्यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यांना मोगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले आहे.

मालविका यांच्या आपसोबतही अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या होत्या. पण त्यातून काहीच हाती लागले नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्या काँग्रेसमध्ये दाखल होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानुसार निवडणूक जाहीर होताच मालविका यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT