मुख्यमंत्र्यांना दे धक्का! पक्षानं भावाचंच तिकिट कापलं

काँग्रेसने आज पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी 86 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसने (Congress) आज 86 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनाच मोठा धक्का दिला आहे. चन्नी यांच्या भावालाच काँग्रेसने उमेदवारी नाकारली आहे.

काँग्रेसने आज जाहीर केलेल्या 86 उमेदवारांच्या यादीनुसार, मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे राखीवन चमकौर साहिब मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. यादीत प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (अमृतसर पूर्व), खासदार प्रतापसिंग बाजवा (काडियन), उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा (डेरा बाबा नानक), उपमुख्यमंत्री ओ.पी.सोनी (अमृतसर मध्य) आणि परगतसिंग (जालंधर कॅन्टोन्मेंट) या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Charanjit Singh Channi
दे धक्का! भाजपमधून सहाच दिवसांत घरवापसी करणाऱ्या आमदाराचा पत्ता कट

काँग्रेसने या यादीत मुख्यमंत्री चन्नी यांना मोठा धक्का दिला आहे. चन्नी हे त्यांच्या भावासाठी बस्सी पठाणा मतदारसंघातून आग्रही होते. यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. चन्नी यांचे बंधू मनोहरसिंग यांना काँग्रेसने तिकिट वाटपात डावलले आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान आमदार गुरप्रितसिंग यांना उमेदवारी दिली आहे. आता पक्ष नेतृत्वाने या तिकिटवाटपात चन्नी यांना डावलल्याचे मानले जात आहे.

Charanjit Singh Channi
पंजाबमध्ये पुन्हा एकदा सिद्धू विरुद्ध कॅप्टन थेट सामना

राज्यात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने 117 पैकी 77 जागा मिळवत अकाली दल व भाजप आघाडीच्या ताब्यात सत्ता काबीज केली होती. हे दोन्ही पक्ष सलग 10 वर्षे राज्यात सत्तेत होते. या निवडणुकीत आप 20 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता, तर अकाली दलाला 15 आणि भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com