Baba Siddique, Lawrence Bishnoi Sarkarnama
देश

Lawrence Bishnoi Gang : मोठी बातमी : बाबा सिद्दीकी यांच्यानंतर पुण्यातील बडा नेता होता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर

Baba Siddique Murder Pune Political Leader Mumbai Crime Branch : मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केलेल्या एका आरोपीच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे.

Rajanand More

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रसचे मुंबईतील नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर अनेक मोठे खुलासे समोर येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगचा या हत्येत हात असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र, आता पुण्यातील आणखी एक नेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे.

ANI या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. वृत्तात म्हटले आहे की, मुंबई गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक बडा नेता बिश्नोई गँगच्या रडारवर होता.

‘लॉरेन्स बिश्नोई गँगने पुण्यातील नेत्याची हत्या करण्याचाही प्लॅन केला होता. ही जबाबदारी प्लॅन बी मध्ये सहभागी असलेल्या शुटर्सकडे देण्यात आली होती’, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

पुण्यातील नेत्याचे नाव पोलिसांनी उघड केले नाही. बिश्नाई गँगचा प्लॅन समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने याबाबत मिळालेली माहिती पुणे पोलिसांना दिली आहे. गुन्हे शाखेने हत्येसाठी वापरण्यात येणारे पिस्तुल जप्त केल्यानंतर हत्येचा कट उघडकीस आल्याचा दावाही पोलिसांनी केल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या गुन्ह्याच्या अनुषंगाने रेकी झाली होती का, याचा तपास पोलिस करत आहेत.’ मुंबई पोलिसांनी शुक्रवारी बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील एक शुटर गौरव विलास अपुने याला अटक केली आहे. बिश्नोई गँगच्या प्लॅन बी मध्ये गौरवचा सहभाग होता. तो फायरिंगच्या सरावासाठी झारखंडला गेला होता.

प्लॅन ए अपयशी ठरल्यास प्लॅन बी तयार करण्यात आल्याचे गौरवकडे करण्यात आलेल्या तपासात समोर आले आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेला रुपेश मोहोळ हा आरोपीही झारखंडमध्ये गेल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्येच्या प्लॅनमागचा मास्टरमाईंड असलेला शुभम लोणकर याने दोघांना 28 जुलैला आवश्यक हत्यारांसह झारखंडला पाठविले होते. तिथे सराव केल्यानंतर ते दोघे पुण्यात परतले, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT