Amit Shah : मुस्लिम आरक्षणावरून अमित शाहांनी ठणकावले; म्हणाले, भाजप असेपर्यंत हे होऊ देणार नाही!

Rahul Gandhi Jharkhand Assembly Election Muslim Reservation : झारखंडमधील प्रचारसभेत बोलताना अमित शाह यांनी राहुल गांधींना उद्देशून हे विधान केले आहे.  
Amit Shah Muslim Reservation
Amit Shah Muslim ReservationSarkarnama
Published on
Updated on

Ranchi News : ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी 17 मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये मुस्लिमांना नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आरक्षणाच्या या मागणीवरून काँगेस नेते राहुल गांधी यांना उद्देशून मोठं विधान केले आहे.

झारखंडमधील एका प्रचारसभेत बोलताना शाह यांनी भाजप असेपर्यंत अल्पसंख्यांकांना या देशात आरक्षण मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. काँग्रेस पक्ष आरक्षणाविषयी बोलतो. संविधानामध्य धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद नाही. महाराष्ट्रातील उलेमा गटाने त्यांना (काँग्रेस) एक मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यामध्ये दहा टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.

Amit Shah Muslim Reservation
BJP MLA to officers : अधिकारी पैसे घेतात, त्यांना मारेन! भाजपच्या महिला आमदाराची मंत्र्यासमोरच धमकी

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आपण आरक्षण मिळवून देण्यासाठी मदत करू, असे म्हटले आहे. मी झारखंडमधील लोकांना विचारण्यासाठी आलो आहे की, मुल्सिमांना दहा टक्के आरक्षण दिले तर कुणाचे आरक्षण कमी होणार? मागासवर्ग, दलित आणि आदिवासींचे आरक्षण कमी होईल, असे शाह म्हणाले.

राहुल गांधी यांना मी इथून सावध करू इच्छितो की, ‘राहुल बाबा, तुमच्या मनात कसलेही षडयंत्र सुरू असले तरी भाजप असेपर्यंत या देशात अल्पसंख्यांकांना आरक्षण मिळणार नाही.’ दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणासाठीही लढणार असल्याचे यापूर्वी अनेकदा म्हटले आहे.

Amit Shah Muslim Reservation
Assembly Election : भाजपच्या ‘नॅरेटिव्ह’विरोधात काँग्रेसचे मुख्यमंत्री मैदानात; म्हणाले, मोदींनी खोटे बोलणे थांबवले नाही तर...

दरम्यान, उलेमा बोर्डाने काँग्रेसकडे केलेल्या मागण्यांवरून भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. या मागण्यांमध्ये आरक्षणासाठी वक्फ विधेयकाला विरोध, महाराष्ट्रातील ४८ जिल्ह्यांती मशिदी, कब्रस्तान, दर्ग्यांच्या जप्त केलेल्या जमिनींचे सर्वेक्षण, महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, पोलिस भरतीत मुस्लिम तरुणांना प्राधान्य आदी मागण्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com