नवी दिल्ली : पंजाबमधील (Punjab) काँग्रेसचा (Congress) नेता व प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळं राज्यभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सिद्धूच्या हत्येमागे गँगवॉर हेच कारण असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यानंतर आणखी एक लोकप्रिय पंजाबी गायक हिटलिस्टवर असल्याचं समोर आलं आहे. त्याला धमक्या आल्या असून, त्यानं सुरक्षेची मागणी केली आहे. (Sidhu Moose Wala News Updates)
मनकीर्त ऑलख याला ठार मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. दलविंदर बम्बिहा गँगनं त्याला मागील महिन्यात धमक्या दिल्या होत्या. सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात नाव आलेल्या बिष्णोई गँगची ही प्रतिस्पर्धी गँग आहे. मनकीर्त याला धमक्या येऊ लागल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धूच्या हत्येनंतर आणखी एका गायकाच्या जिवाला धोका असल्याचं यामुळं स्पष्ट झालं आहे. खुद्द मनक्रीतनं पंजाब पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. सिद्धूची सुरक्षा कमी केल्यानंतर 24 तासांतच त्याची हत्या झाली होती. यामुळे मनकीर्तला तातडीने सुरक्षा पुरवली जाणार असल्याचं समजते. (Mankirt Aulakh News)
बम्बिहा गँगचा प्रमुख दविंदर बम्बिहा हा खंडणी रॅकेट चालवत होता. चंडीगड, मोहाली आणि पंचकुला परिसरात त्याचे हे रॅकेट सुरू होते. नंतर 2016 मध्ये पंजाब पोलिसांशी झालेल्या चकमकीत बम्बिहा मारला गेला होता. त्यानंतर त्याचे सहकारी दिलप्रीत आणि सुखप्रीत ऊर्फ बुढा हे दोघे तुरुंगातून ही गँग चालवत आहेत. नुकतीच दिल्लीतील रोहिणी न्यायालयात गँगस्टर जितेंदर गोगी याची हत्या झाली होती. बम्बिहा गँगने तुरुंगातूनच हा कट रचल्याचं नंतर समोर आलं होतं.
सिद्धूच्या हत्येमागे गँगस्टर बिष्णोईचा हात असल्याचा संशय आहे. हा बिष्णोई सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. पंजाब पोलीस मला चकमकीत ठार मारतील, अशी भीती व्यक्त करीत बिष्णोईने न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा ताबा पंजाब पोलिसांकडे देऊ नये, अशी मागणी त्यानं न्यायालयाकडं केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विष्णोईच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून दिल्ली पोलिसांनी तिहारमध्ये असलेल्या बिष्णोईची सुरक्षा वाढवली आहे. त्यानेच कारागृहात बसून सिद्धूच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.