सिद्धू मूसेवालाच्या हत्येमुळं 'आप' सरकार अडचणीत; उच्च न्यायालयानं बजावली नोटीस

सिद्धू मूसेवालाच्या हत्येमुळं पंजाबमध्ये तणाव
Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमधील (Punjab) काँग्रेसचा (Congress) नेता व प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळं राज्यभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच या प्रकरणी राज्यातील आम आदमी पक्षाचं (AAP) सरकार अडचणीत आलं आहे. उच्च न्यायालयाने याबाबत सरकारची कानउघाडणी करीत नोटीस बजावली आहे. (Sidhu Moose Wala News Updates)

सिद्धू मूसेवालासह 424 जणांची सुरक्षा सरकारनं कमी केली होती. सुरक्षा कमी करण्यात आलेल्या व्यक्तींची यादीही उघड झाली होती. यावरून आज पंजाब हरियाना उच्च न्यायालयानं आप सरकारला झापलं. सुरक्षा कमी काढण्यात आलेल्या व्यक्तींची यादी उघड झालीच कशी? असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला. याप्रकरणी न्यायालयानं सरकारला नोटीस बजावली आहे. सिद्धू मूसेवालासह इतर 424 जणांची सुरक्षा कोणत्याही निकषांच्या आधारे कमी केली, याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारने लिफाफाबंद अहवाल 2 जूनला सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत.

विशेष म्हणजे, पंजाबमधील आप सरकारनं व्हीआयपींची सुरक्षा कमी केल्याचं ट्विटही केलं होतं. सरकारनं पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये 424 जणांची सुरक्षा कमी केल्याचा उल्लेख होता. पंजाबमध्ये व्हीआयपी संस्कृतीवर वार, असे त्यात म्हटले होते. सर्वांत महत्वाची बाब म्हणजे सुरक्षा कमी करण्यात आलेल्या काही निवडक व्यक्तींची नावे त्यात देण्यात आली होती. यात गायक सिद्धू मूसेवालाचेही नाव होते. पंजाबमध्ये व्हीआयपी सुरक्षेवर मोठी कारवाई, असं म्हणत या ट्विटमध्ये मुख्यमंत्री मान यांचा फोटोही होता.

Sidhu Moose Wala
भाजपनं टाकला डाव! चौथ्या जागेसाठी सुभाष चंद्रा यांना उतरवलं मैदानात

सिद्धू मूसेवालाची हत्या कशी झाली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला हा त्याच्या गाडीतून जात असताना दोन गाड्यातून हल्लेखोर त्याचा पाठलाग करीत होते. जवाहरके गावात त्यांनी सिद्धूच्या गाडीवर गोळीबर केला. यात तो जागीच ठार झाला. दोन गुन्हेगारी टोळ्यांतील अंतर्गत संघर्षातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी रशियन बनावटीच्या एएन-94 रायफलींचा वापर केला. सिद्धू याच्यावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या. त्या किमान तीन रायफलींमधून झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी नंतर त्याचा मृत्यू झाल्याची खातरजमा करूनच तेथून पलायन केलं. सिद्धूबरोबर असलेले दोन जण जखमी असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Sidhu Moose Wala
सिद्धूच्या हत्येचा तिहारमध्ये शिजला कट! मुख्य सूत्रधार असलेल्या गँगस्टरची सुरक्षा वाढवली

लोकप्रिय गायक असण्यासोबत वादग्रस्तही

सिद्धू मूसेवाला हा लोकप्रिय असण्यासोबत वादग्रस्तही होता. विधानसभा निवडणुकीआधी त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला पक्षात आणण्यामागे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा हात होता. गायक सिद्धू हा 28 वर्षांचा होता आणि त्याच्या गँगस्टर रॅपचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याच्यावर अनके गुन्हे दाखल होते. गाण्यातून बंदुकीचा वापर आणि हिंसाचाराला खतपाणी घातल्याबद्दल त्याच्यावर हे गुन्हे दाखल होते. त्याचे मूळगाव मानसामध्ये असून, त्याच मतदारसंघातून तो निवडणूक लढला होता. त्याचा आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय सिंगला यांनी पराभव केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com