Akhilesh Yadav  sarkarnama
देश

'द कश्मीर फाईल्स' नंतर आता 'लखीमपूर फाईल्स'?

The Kashmir Files|BJP|Akhilesh Yadav : जीपच्या चाकांखाली शेतकऱ्यांना चिरडण्यात आले तिथल्या घटनेवर 'लखीमपूर फाईल्स' असा चित्रपट बनायला हवा, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शन केलेल्या 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावरून देशातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह अनेक भाजपा (BJP) नेत्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. तर, विरोधकांनी मात्र यावर टीकेची झोड उडवली आहे. या चित्रपटाबाबत बोलतांना समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी टीका केली असून ज्याप्रकारे हा चित्रपट काढण्यात आला तसाच 'लखीमपूर फाईल्स' असाही चित्रपटही बनायला हवा, अशी मागणी करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

अखिलेश यादव म्हणाले, 'कश्मीर फाईल्स' सारखा असा चित्रपट बनू शकतो तर, जीपच्या चाकांखाली शेतकऱ्यांना चिरडण्यात आले तिथल्या घटनेवर सुद्धा 'द लखीमपूर फाईल्स' असाही चित्रपट बनायला हवा, अशी मागणी करत अखिलेश यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते काल (ता.17 मार्च) सीतापूर जिल्ह्यात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी द कश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत त्यांना विचारण्यात आले त्यावर त्यांनी आपले मत मांडले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट १९९० च्या काळात काश्मीरी पंडितांच्या समस्यांवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटास देशातील भाजपशासित 8 राज्यात टॅक्स फ्री करणात आला आहे. त्यात उत्तरप्रदेशचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर अखिलेश बोलत होते.

दरम्यान, 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावरुन बुधवारी (ता.१६ मार्च) महाराष्ट्राच्य विधानसभेतही गोंधळ झाला होता. भाजप आमदारांनी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत हा चित्रपट केंद्र सरकारने करमुक्त केला, तर तो निर्णय संपूर्ण देशात लागू होईल, असे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT