Lok Sabha  Sarkarnama
देश

MP resignation news : पक्षाच्या अध्यक्षांनी दिलेलं आव्हान खासदारानं स्वीकारलं; थेट राजीनाम्याची तारीखच जाहीर केली, पक्षालाही रामराम ठोकणार...

Aga Syed Ruhullah Mehdi, National Conference MP resignation : कलम ३७०, राज्याचा दर्जा व उमर अब्दुल्लांच्या भूमिकेवरून आगा सैयद रुहुल्ला मेहदी आक्रमक; पक्षातील अंतर्गत कलह उफाळला.

Rajanand More

National Conference latest news : जम्मू आणि काश्मीरच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झाले आहे. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षामध्ये खासदारानेच बंडाचे निशाण फडकावले आहे. लोकसभेचे खासदार आगा सैयद रुहुल्ला मेहदी यांनी पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी दिलेले आव्हान स्वीकारत थेट राजीनाम्याची तारीख जारी करत खळबळ उडवून दिली आहे.

मेहदी हे श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. निवडणूक पार पडल्यानंतर काही दिवसांतच पक्षनेतृत्वासोबत त्यांचे खटके उडण्यास सुरूवात झाली होती. आता हा वाद शिगेला पोहचला असून त्याचे रुपांतर मेहदी यांच्या राजीनाम्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अब्दुल्ला यांनी मेहदी यांची बदलती राजकीय भूमिका पाहून त्यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले होते.

खासदारकीचा राजीनामा देऊन स्वत:च्या हिंमतीवर निवडून दाखवावे, असे आव्हान अब्दुल्ला यांनी दिले होते. हे आव्हान स्वीकारत आगा यांनी अब्दुल्ला यांनी खरमरीत पत्र लिहित राजीनाम्याची तयारी दर्शविली होती. आता त्यांनी राजीनाम्याची तारीखही जाहीर केली आहे. राज्य सरकार तसेच पक्षाच्या कलम ३७० बाबतची बदलती भूमिका, निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने, राज्याचा दर्जा आदी मुद्यांवर आगा नाराज होते. तसेच त्यांनी पत्रात स्पष्ट करत अब्दुल्ला यांनाही आपली भूमिका जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे.

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोपही आगा यांनी कला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी वाढत चालली होती. परिणामी, अब्दुल्ला यांनी अखेरचा घाव घालत त्यांना थेट राजीनाम्याचे आव्हान दिले. आगा यांच्याकडून आता खासदारकी आणि पक्षाचाही राजीनामा दिला जाणार आहे. त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी ते राजीनामा देणार आहेत.

दरम्यान, आगा हे श्रीनगर मतदारसंघातून तब्बल १ लाख ८८ हजार मतांनी विजयी झाले आहेत. ही मतांमध्ये पक्षाचा मोठा वाटा असल्याचे अब्दुल्ला म्हणाले होते. आगा यांनी पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार वहीद उर रहमान पारा यांचा पराभव केला होता. आगा हे बडगाम विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार होते. तसेच त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भूषविले आहे. त्यामुळे आगा यांचे बंड पक्षासाठी झटका मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT