Kedarnath Helicopter Crash : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानातील 241 जणांसह विमान ज्या परिसरात कोसळलं तेथील 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
या विमान अपघातामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असतानाच आता आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उत्तराखंडमधील केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशन कंपनीचं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे.
ज्यामध्ये जवळपास सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. केदारनाथमधील गरुडचट्टीजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. महत्वाची बाब म्हणजे हे हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते क्रॅश माहिती समोर आली आहे.
या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच NDRF आणि SDRF च्या तुकड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी सांगितले की, देहरादूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ बेपत्ता झाले आहे.
गौरीकुंड दरम्यान हेलिकॉप्टर बेपत्ता झाले असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. केदारनाथ येथ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामुळे नुकतंच अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या दु:खद आठवणी जाग्या झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.