asaduddin owaisi sarkarnama
देश

AIMIM : ओवैसी यांच्या घरावर जोरदार दगडफेक ; चौथ्यांदा हल्ला

House Attacked AIMIM asaduddin owaisi: खिडक्याच्या काचा फुटलेल्या दिसल्या. चारही बाजूला दगड पडलेले होते.

सरकारनामा ब्युरो

House Attacked AIMIM asaduddin owaisi: एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना नुकतीच घडली. नवी दिल्लीतील अशोका रोड येथील ओवैसी यांच्या घरावर काही अज्ञान लोकांनी दगड फेक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या हल्लानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिस उपआयुक्तांनी घटनास्थळी भेट घेतली. पोलिसांनी येथून काही पुरावे जमा केले आहेत. या हल्लात ओवैसी यांच्या घराचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काल (रविवारी) ही घटना घडली. ओवैसी रात्री घरी आल्यावर त्यांना हा प्रकार समजला. सांयकाळी अज्ञान व्यक्तींनी दगडफेक केल्याचे ओवैसीच्या बंगल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या घटनेबाबत ओवैसी म्हणाले, "काल रात्री मी साडेअकरा वाजण्याच्या सुमारात घरी आलो. तेव्हा मला खिडक्याच्या काचा फुटलेल्या दिसल्या. चारही बाजूला दगड पडलेले होते. माझ्या घरावर हा चौथा हल्ला आहे. माझ्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही आहेत. या माध्यमातून पोलिसांनी हल्लेखोऱ्यांना शोधले पाहिजे. याबाबत पोलिसांचे तक्रार दिली आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT