MNS : ..पक्षाचं नाव गेलं..; राज ठाकरे नावाविषयी म्हणाले, "बाळासाहेबांनी मला बोलवलं..

MNS raj thackeray : “इंच इंच विकू, जे दिसेल ते विकायचं आणि त्यातून पैसे कमवायचं, हे उद्योग सध्या सुरू आहेत.
MNS raj thackeray news
MNS raj thackeray newssarkarnama
Published on
Updated on

MNS raj thackeray : "नावात काय आहे, या ऐवजी नावात काय नाही," असा प्रश्न खरं तर महाराष्ट्रात सध्या विचारला जात आहे. नावात काय आहे, हे नुकतेच आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयावरुन स्पष्ट झाले आहे.

शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिल्यानंतर काय घडलयं हे आपण पाहतोयं. मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या नावाबाबत अशीच माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. ते एका मुलाखतीत बोलत होते. या कार्यक्रमात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंना काही प्रश्न विचारले. त्याला राज ठाकरेंना दिलखुलासपणे उत्तरे दिली

राज ठाकरे यांनी आपलं खरं नाव काय आहे, याचा उलगडा विद्यार्थ्यांसमोर केला. ते म्हणाले, "माझे वडील श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. त्यामुळे मी संगीतक्षेत्रात काहीतरी करावं, अशी त्यांची इच्छा होती, म्हणून त्यांनी माझं नाव 'स्वरराज'ठेवलं. पण नंतर माझा 'राग'कळाला. मी व्यंगचित्र काढायचो, स्वरराज ठाकरे या नावाने ते काढायचो. पुढे एके दिवशी बाळासाहेबांनी मला बोलवलं ते म्हणाले, 'मी व्यंगचित्रकार म्हणून करिअरची सुरवात बाळ ठाकरे या नावाने केली. आजपासून तू तुझ्या करिअरची सुरवात राज ठाकरे नावाने करायची, तेव्हापासून माझं नाव राज ठाकरे झालं.

MNS raj thackeray news
Raj Thackeray : 'मला बायको असून माहिती नव्हती,' असं राज ठाकरे का म्हणाले..

“इंच इंच विकू, जे दिसेल ते विकायचं आणि त्यातून पैसे कमवायचं, हे उद्योग सध्या सुरू आहेत. सरकारच्या गोष्टी सरकारकडून काढायच्या आणि खासगी लोकांच्या घशात घालायच्या हा प्रकार सुरू आहे," अशी टीका त्यांनी केली.

"आपण कोण आहोत, आपला वारसा काय, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरही औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात होता, औरंगजेबची जी पत्र गेली आहेत, त्यात त्याने शिवाजी अजून मला छळतोय असा उल्लेख केलेला आहे. संभाजी राजे, राजाराम महाराज, संताजी धनाजी यांची जी प्रेरणा होती, यांच्यामधील शिवाजी महाराज यांचा विचार औरंगजेबला मारायचा होता, त्यांची जी प्रेरणा होती त्यांना तो शिवाजी म्हणत होता,” असे ते म्हणाले.

"आजही मला भाषण देताना टेन्शन येतं, भाषणाच्या दिवशी हात थंड पडतात. कारण मी काय बोलणार हे मला माहित नसते. भाषणाच्या वेळी मी काही मुद्दे काढतो, पण ते बाजूला ठेवून माझे भाषण होते. मला ठरवून भाषण करता येत नाही, मनातून जे वाटतं ते बोलतो,"

"१९९१ मध्ये माझे एका ठिकाणी भाषण होते. माझे ते भाषण ऐकण्यासाठी माँ (मीनाताई ठाकरे) आली होती. त्यानंतर ती मला बाळासाहेबांकडे घेऊन गेली. बाळासाहेबांनी माझे ते भाषण घरी ऐकले होते. भाषणाच्या ठिकाणी स्पीकरवरुन एका फोनच्या माध्यमातून त्यांनी भाषण ऐकलं होते,"असे राज म्हणाले.

बाळासाहेबांनी त्यांच्या वडिलांनी दिलेला एक मंत्र मला सांगितला. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल, कसं बोललात हे महत्त्वाचं नाही, समोरच्या काय विचार करायला दिला हे विचार कर. आपण कसे शहाणे आहोत, हे सांगण्यापेक्षा ते कसे शहाणे होतील हे सांगावे, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला," असे राज ठाकरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com