Lalu Prasad Yadav Sarkarnama
देश

भाजपच्या दबावामुळं लालूंना ‘एम्स’मध्ये केलं नाही भरती!

लालूप्रसाद यादव यांच्या तब्बेतीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांना मंगळवारी झारखंडमधून तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या तब्बेतीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांना मंगळवारी झारखंडमधून तातडीने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले होते. पण बुधवारी पहाटे डिस्चार्ज देण्यात आल्यानं आरजेडीच्या नेत्यांनी गंभीर आरोप केला आहे.

आरजेडीचे आमदार भाई वीरेंद्र यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या दबावामुळे लालूप्रसाद यादव यांना एम्सने भरती करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यादव यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचलं जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या आरोपांनंतर एम्सकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना दाखल करून घेण्याची गरज नव्हती, असं एम्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. लालूंना पहाटे तीन वाजता डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे त्यांना पुन्हा झारखंडमधील ‘रिम्स’ रुग्णालयात हलवण्यात आलं. मंगळवारी दुपारी लालूंची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रांचीतील रुग्णालयातून दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले.

लालूंना पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणात (fodder scam) पाच वर्षे कारावास आणि 60 लाख रूपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने नुकतीच सुनावली आहे. त्यांच्या जामिनावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांना हृदयविकार आणि मूत्रपिंडविकाराचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये हलवण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने मंगळवारी घेतला होता.

मागील वर्षी डॉक्टरांनी लालूंच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्यात केला होता. या अहवालानुसार, लालूंना मागील 20 वर्षांपासून मधुमेह आहे. हा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यांचे अवयव अतिशय वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे. लालूंची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी ढासळू शकते. किडनीची काम करण्याची क्षमता कधीही कमी होऊ शकते आणि ती नेमकी कधी कमी होईल, हे सांगता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT