Air Marshal VK Chaidhary sarkarnama
देश

मराठवाड्याचे सुपुत्र व्ही. आर. चैाधरी होणार नवे वायुदलप्रमुख

व्ही. आर. चैाधरी (Air Marshal VK Chaidhary) यांना लढाऊ आणि प्रशिक्षण विमानांच्या ३, ८०० तासांहून अधिक काळाचा उड्डाणाचा अनुभव आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : एअर मार्शल व्ही. आर . चैाधरी (Air Marshal VK Chaidhary) यांची देशाच्या वायुदलप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय संरक्षण मंत्र्यालयाने घेतला आहे. चैाधरी हे सध्या वायुदलाचे उपप्रमुख आहेत. सध्याचे वायुदल प्रमुख आरकेएस भदैारिया हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे. एअर मार्शल विवेक राम चैाधरी १ जुलै रोजी वायुदलाच्या उपप्रमुखाचा पदभार स्वीकारला होता.

चैाधरी यांना विविध प्रकारच्या लढाऊ आणि प्रशिक्षण विमानांच्या ३, ८०० तासांहून अधिक काळाचा उड्डाणाचा अनुभव आहे. एनडीए आणि संरक्षण सेवा स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनचे चैाधरी हे माजी विद्यार्थी आहेत. उपप्रमुख होण्यापूर्वी ते वायुदलाच्या पश्चिम कमांडचे एअर आँफिसर कमांडिग-इन-चीफ होते. ते १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धातही त्यांचा सहभाग होता.

एअऱ मार्शल एचएस अरोडा हे सेवानियुक्त झाल्यानंतर व्हि. के. चैाधरी यांची उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हस्तरा या गावाचे रहिवासी आहेत. नांदेड येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. त्यानंतरचे पुढील शिक्षण पुण्यात मिल्ट्री स्कूल, एनडीए येथे झाले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT