Ajit Pawar NCP News : Praful Patel  Sarkarnama
देश

Ajit Pawar NCP News : अजित पवारांनी दिल्लीच्या राजकारणात वाढवला दबदबा !

Ajit Pawar on Party Building : "पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले."

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला देशभरातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे समर्थन मिळत आहे, असा दावा अजित पवार यांच्या गटाने केला आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे अजित पवार दिल्लीच्या राजकारणात दबदबा निर्माण करत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बिहार व हरियाणाच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राष्ट्रीय सचिव ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.

बिहारमध्ये राहत कादरी व हरियाणामध्ये विजय पाल यांची पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष यांनी दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रदेशाध्यक्षाना मार्गदर्शन करताना प्रफुल पटेल म्हणाले, "पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पक्षाची ओळख झालेली आहे. त्यामुळे सर्वांने जबाबदारीने अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आता पक्षाला पुढे घेऊन जायचे आहे. कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून राष्ट्रवादी काँग्रेसला पुढे नेण्यासाठी नव्या नेतृत्वासोबत काम करायचे आहे. "

राष्ट्रीय प्रवक्ते ब्रजमोहन माहिती देताना म्हणाले, "संपूर्ण देशातून मोठया प्रमाणात समर्थनपत्र, शपथपत्र मिळत आहेत. त्यामुळे नवीन नेतृत्वाला पाठिंबा मिळत असल्याचे सिद्ध होत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT