Ajit Pawar Sarkarnama
देश

NCP Candidate List News जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'ची पहिली उमेदवार यादी जाहीर!

Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीतीन टप्प्यात मतदान होणार असून, निकाल चार ऑक्टोबर जाहीर होणार आहे.

Mayur Ratnaparkhe

NCP and Jammu and Kashmir VidhanSabha Election : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे. पुलवामा जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये त्राल येथून मोहम्मद युसूफ हझम, पुलवामा येथून इश्तियाक अहमद शेख आणि राजपुरा मधून अरुण कुमार रैना या उमेदवारांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी( Vidhan sabha Election) तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 90 सदस्यीय विधानसभेसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर रोजी आणि एक ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर निकाल चार ऑक्टोबर जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर जवळपास एका दशकानंतर पहिल्यांदा ही विधानसभा निवडणूक होत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये(Jammu and Kashmir) पहिल्या टप्प्यात 24 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात क्रमशा 26 आणि 40 जागांवर मतदान होईल. जम्मू-काश्मीरमध्ये मागील विधानसभा निवडणूक 2014 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच टप्प्यात होणार होती, तेव्हा हे एक राज्य होते आणि लडाखही याचा भाग होता.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक लढवत आहे. पुढच्या टप्प्यातील बाकी उमेदवारांची नावं लवकरच जाहीर केली जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी अजित पवार यांनी चांगलीच तयारी केली आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली असून, प्रचारासाठी 25 स्टार प्रचारकांची घोषणा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी जाहीर केलेल्या यादीत पक्षाच्या 25 प्रमुख नेत्यांचा समावेश असून या भागातील निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. या यादीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, एस. आर. कोहली, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल यांचा समावेश आहे.

या अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये एक मजबूत आणि प्रभावी मोहीम राबवली जाणार आहे. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नक्कीच प्रयत्न करेल, असा विश्वास ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaaprkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT