Ram Madhav News : जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी भाजपने राम माधव यांच्यावर सोपवली महत्त्वपूर्ण जबाबदारी!

BJP Ram Madhav in charge of Jammu and Kashmir : जी किशन रेड्डीही सोबतीला असणार आहेत; भाजपसह सर्वच राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी कसली कंबर
Ram Madhav
Ram MadhavSarkarnama
Published on
Updated on

Jammu and Kashmir Vidhan sabha Election : राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांचं पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात दमदार पुनरागमन झाल्याचं दिसत आहे. जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून राम माधव यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली गेली आहे.

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राम माधव यांच्यासोबत जी किशन रेड्डी यांच्यावर देखील प्रभारी म्हणून जबाबदारी असणार आहे. पुढील महिन्यात जम्मू काश्मीरमधे विधानसभेच्या 3 टप्प्यात निवडणुका होत आहेत. विशेष यापूर्वी देखील राम माधव यांच्यावर जम्मू काश्मीरची जबाबदारी होती.

भाजपने मंगळवारी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव(Ram Madhav) आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात याबाबत माहिती दिली गेली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Ram Madhav
Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक महाराष्ट्र अन् हरियाणा सोबतच होणार?

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी( Vidhan sabha Election) तीन टप्प्यात मतदान होणार आहे. ९० सदस्यीय विधानसभेसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर रोजी आणि एक ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर निकाल चार ऑक्टोबर जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर जवळपास एका दशकानंतर पहिल्यांदा ही विधानसभा निवडणूक होत आहे.

Ram Madhav
Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांना जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठा झटका!

जम्मू-काश्मीरमध्ये(Jammu and Kashmir) पहिल्या टप्प्यात २४ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात क्रमशा २६ आणि ४० जागांवर मतदान होईल. जम्मू-काश्मीरमध्ये मागील विधानसभा निवडणूक 2014 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच टप्प्यात होणार होती, तेव्हा हे एक राज्य होते आणि लडाखही याचा भाग होता.

मात्र आता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपनेही कंबर कसली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com