Ajit Pawar-led NCP leaders in Goa declaring their intent to contest independently sarkarnama
देश

Ajit Pawar NCP Goa - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गोव्यात स्वबळाचा नारा; राष्ट्रीय नेत्यानेच केलं जाहीर!

Goa Political News - महाराष्ट्रात महायुतीतसोबत असलेल्या राष्ट्रवादीने गोव्यात स्वबळाचा नारा दिल्याने, शिंदेंची शिवसेना देखील स्वबळाचा नारा देणारा का?

Mayur Ratnaparkhe

Ajit Pawar’s party announces independent strategy in Goa -राष्ट्रवादी गोव्यात स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. याबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते ब्रीजमोहन श्रीवास्तव तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गोव्यात निवडणूक लढण्यासाठी चाचपणी सुरु केल्यानंतर आता, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील गोव्यात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

"तीन दिवसांच्या गोवा राज्याच्या दौऱ्यात मी विविध लोकांच्या भेटी घेणार आहे. यात राज्यातील अनेक मोठे चेहरे देखील आहेत. या लोकांचे मत जाणून घेण्यासाठीच मी येथे आलोय. राष्ट्रवादी गोव्यात कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवेल," असे  राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महामंत्री ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे. तीन दिवसांसाठी गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 मार्च महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गोव्यात बेकायदा गोष्टीविरोधात जनआंदोलन उभारून वातावरण निर्मिती केल्यानंतर निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नेत्यांची बैठक यावेळी पार पडली होती. यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने गोव्यात चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.  तसेच, महाराष्ट्रात युतीसोबत असलेल्या राष्ट्रवादीने गोव्यात स्वबळाचा नारा दिल्याने, शिंदेंची शिवसेना देखील स्वबळाचा नारा देणारा का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सध्या राज्यात भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे युती सरकार अस्तित्वात आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षांतर करुन भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप 'मगो'ला सोबत घेण्याची शक्यात धुसर झाली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी देखील याबाबत वेळोवेळी तसे संकेत दिले आहेत.

२०२७ मध्ये भाजप स्वबळाचा नारा देण्याची दाट शक्यता आहे. पण, राज्यातील प्रादेशिक पक्ष तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सर्व पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास आगामी निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होणार यात शंका नाही.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्याने पहिल्यांदाच गोव्याला भेट दिली आहे. तर, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोव्यातील नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत किती कार्यकर्ते आणि कोणकोणते नेते उभे राहणार हे देखील पाहावे लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT