Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताने डोंबिवलीकरांच्या १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ कटू आठवणी झाल्या ताज्या!

A Dombivli Tragedy Repeats - जाणून घ्या, नेमकं काय घडलं होतं ; सध्या प्रत्येक डोंबिवलीकर मनातून प्रचंड दु:खावलेला आहे आणि हळहळ व्यक्त करत आहे.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane CrashSarkarnama
Published on
Updated on

Roshni Songhare, air hostess from Dombivli, dies in Ahmedabad plane crash अहमदाबादेत गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघतात डोंबिवलीतील हवाई सुंदरी रोशनी सोनघरे हिचा मृत्यू झाला. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येक डोंबिवलीकर हळहळ व्यक्त करत असतानाच, त्यांच्या १५ वर्षांपूर्वीच्या कटू आठवणी देखील ताज्या झाल्याचे दिसून आले. कारण डोंबिवलीचीच लेक असलेल्या तेजल या हवाई सुंदरीचा देखील असाच मृत्यू झाला होता.

मंगलोर येथील विमान अपघातात डोंबिवलीतील हवाई सुंदरी तेजल कामुलकर हिचा मृत्यू झाला होता. पंधरा वर्षापूर्वी म्हणजेच 22 मे 2010 रोजी हा अपघात झाला होता. खरंतर रोशनी आणि तेजल या दोन्ही मुलींनी हालाखीच्या परिस्थितीवर मात करत हवाई सुंदरी होण्याची स्वप्न पाहिली आणि ती प्रत्यक्षातही उतरवली होती. मात्र त्या स्वप्नांचा आनंद त्यांना फार काळ घेता आला नाही. हे दुःख प्रत्येक डोंबिवलीकराच्या मनात आहे.

अहमदाबाद येथील विमान अपघातात रोशनीचा मृत्यू झाला. यावर शोक व्यक्त करतानाच डोंबिवलीकरांना तेजलच्या मृत्यूचीही आठवण होत होती. पंधरा वर्षापूर्वीच्या त्या कटू आठवणींना डोंबिवलीकरांनी सोशल मीडियातून मांडल्या. ‘डोंबिवलीत पंधरा वर्षांनी पुनरावृत्ती’ असे म्हणत पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 22 मे 2010 रोजी मंगळूर एअरपोर्टवर असाच विमान अपघात झाला होता आणि या विमान दुर्घटनेत सुद्धा डोंबिवलीतील हवाई सुंदरी तेजलचा मृत्यू झाला होता.

Ahmedabad Plane Crash
Vijay Rupani - विजय रुपाणींचा 'लकी' नंबर '१२०६' अखेर त्यांच्यासाठी ठरला 'अनलकी', जाणून घ्या कसा?

 तेजल ही तुकाराम नगर येथील सौभाग्य इमारतीत आपल्या कुटुंबासह राहत होती. पंधरा वर्षापूर्वीच्या अपघातात 166 पैकी 158 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. त्यात 6 क्रू मेंबर्स होते. त्यातील एक डोंबिवलीची तेजल कामुलकर जी केबिन क्रू मेंबर म्हणून काम करत होती. तिचा मृतदेह सुद्धा दोन दिवसांनी ताब्यात मिळाला होता. ते दोन दिवस तुकाराम नगर परिसरात दुःखवटा पसरला होता आणि आता १५ वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती झाली. केबीन क्रू म्हणून काम करणारी डोंबिवलीची तरुणी अशाच विमान अपघाताचा बळी ठरली आणि डोंबिवलीवर दुःखाची छटा पसरली.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash : कुलदैवताचे दर्शन घेऊन आली अन् रोशनीची लंडन फ्लाईट ठरली अखेरची, लेकीच्या मृत्यूची आईला अजून कल्पनाच नाही!

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेच्या दुःखद बातमीने, तेजल कामुलकरची आठवण आली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत या दोन्ही तरुणींनी शिक्षण घेतले आणि स्वतःच्या हिमतीवर उभ्या राहिल्या होत्या. आपल्या कुटुंबीयांचा त्या आधार बनल्या होत्या, मात्र विमान अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर आणि डोंबिवलीकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा वाईट दुर्घटना घडूच नये असे मनापासून वाटते, अशा शब्दांत सर्वसामान्य डोंबिवलीकरांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com