Akhilesh Yadav makes a major announcement ahead of Uttar Pradesh elections, boosting Samajwadi Party's campaign.  Sarkarnama
देश

Akhilesh Yadav - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांनी केली मोठी घोषणा!

Samajwadi Party on UP Assembly Elections - जाणून घ्या, समाजवादी पार्टीने आता नेमका काय निर्णय घेतला आहे?

Mayur Ratnaparkhe

Akhilesh Yadav’s Strategic Move for UP Elections - समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी २०२७मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. अखिलेश यादव यांनी सांगितलं की, समाजवादी पक्ष व काँग्रेस २०७ची विधानसभा निवडणूक एकत्र लढवतील. लखनऊ येथे समजावादी अल्पसंख्याक सभेच्या बैठकीत अखिलेश यादव यांनी हे जाहीर केलं.

विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशच्या काँग्रेसला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही आणि विधानसभा निवडणुकीत ८०-१७चा फार्म्युला चालणार नाही.

समाजवादी पक्षाच्या अल्पसंख्याक सभेच्या राष्ट्रीय आणि प्रांतीय पदाधिकाऱ्यांची आज लखनऊ येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. अखिलेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर २०२७च्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी कायम राहील, असे यावेळी अखिलेश यादव यांनी स्पष्ट केली.

अखिलेश यादव यांनी २०१७मध्ये देखील उत्तरप्रदेशात काँग्रेससोबत युती केलेली आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला ४७ जागा मिळाल्या व काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या आणि उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार स्थापन झाले होते.

२०१७ च्या निवडणुकीत एनडीएला ३२४ जागा मिळाल्या पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला उत्तरप्रदेशात मोठे यश मिळाले. समाजवादी पक्षाने ३७ आणि काँग्रेसने या ठिकाणी सहा जागा जिंकल्या.

उत्तर प्रदेशातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये झाल्या होत्या. विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पासून सुरू झाला, जो मे २०२७ पर्यंत राहील. अशा परिस्थितीत, पुढील विधानसभा निवडणुका २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे. साधारणपणे कार्यकाळ संपण्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये निवडणुका होऊ शकतात. तथापि, निवडणूक आयोगाने अद्याप २०२७ च्या निवडणुकांच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केलेल्या नाहीत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT