Lalu Yadav Controversy - लालूंकडून आंबेडकरांचा 'अपमान'? अन् बिहारमधील राजकीय गोंधळ; 'त्या' व्हिडिओने ‘राजद’चा खेळ बिघडणार?

Lalu Yadav video controversy -पाहा भाजप नेते अमित मालवीय यांनी तो व्हिडिओ ट्वीट करून नेमकं काय म्हटलं आहे?
 Lalu Prasad Yadav
Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar Politics News - बिहरामध्ये सध्या आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर राजकीय वातवावरण तापलेलं आहे. दरम्यान नुकताच ११ जून रोजी राज सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी त्याचा ७८ वा वाढिवस साजरा केला. मात्र लालूंनी असा विचारही केला नसेल की त्यांनी तीन दिवसांनी त्यांच्या याच वाढदिवसाशी संबधित एक व्हिडिओमुळे त्यांचं टेन्शन वाढेल आणि निवडणूक वर्षात त्यांच्या पक्षासाठी ते अडचणीचं ठरू शकेल.

भाजप नेते अमित मालवीय यानी लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लालूप्रसाद यादव एका खुर्चीवर बसलेले दिसत आहे आणि त्यांनी समोरील दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवले आहेत. तेवढ्यात एक लालू प्रसाद यादव यांचा समर्थक हातात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेवून येतो आणि लालू प्रसाद यादव यांच्यासोबत फोटो काढू लागतो, मात्र ज्या पद्धतीने हा फोटो काढण्यात आला आहे, त्यावरून असे दिसते की, आंबेडकरांचा फोटो लालू प्रसाद यादव यांच्या पायाजवळ आहे आणि आता यावरू राजकीय वाद निर्माण हझलात आहे.                              

अमित मालवीय यांनी लालूप्रसाद यादव यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच दलित व्होट बँकेबाबत बिहारच्या राजकारणातील वातावरण तापले आहे असे दिसते. एकामागून एक, अनेक भाजप नेत्यांनी, विशेषतः दलित समुदायातील नेत्यांनी, या व्हिडिओवरून राजद सुप्रीमोवर हल्ला चढवला आणि त्यांच्यावर दलितांचा अपमान केल्याचा आरोप केला.

 Lalu Prasad Yadav
AAP Claim on Delhi Assembly Election - दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत 'आप'चा खळबळजनक दावा ; काँग्रेसवर केलाय गंभीर आरोप!

अमित मालवीय यांनी लालूप्रसाद यादव यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच दलित व्होट, दलित व्होट बँकेबाबत बिहारच्या राजकारणातील वातावरण तापले आहे, एकामागून एक अनेक भाजप नेत्यांनी विशेषता दलित समुदायातील नेत्यांनी या व्हिडिओवरून लालू प्रसाद यांच्यावर हल्ला चढवला आहे.

तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी लालूप्रसाद यांच्यावर निशणा साधत म्हटले की, दलित आणि मागासवर्गीयांचा अपमान करणे लालू यांच्या डीएनएमध्ये आहे. लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या आय़ुष्यात कोणाचीही आदर वाट नाही आणि त्यांच्या मनात डॉ. बाबासहेब आंबेडकरांबद्दल अजिबात आदर नाही. लालू प्रसाद यादव यांनी जाहीरपणे माफी मागवी

 Lalu Prasad Yadav
Ajit Pawar NCP Goa - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गोव्यात स्वबळाचा नारा; राष्ट्रीय नेत्यानेच केलं जाहीर!

जनता दल युनायटेडनेही या व्हायरल व्हिडिओवरून लालूप्रसाद यांच्यावर हल्ला चढवला. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक झा म्हणाले की, जनता दल युनायटेड बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचे तंतोतंत पालन करते परंतु दुसरीकडे, राजदमध्ये, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लालूप्रसाद यांच्या चरणी अर्पण केला जातो आणि कोणीही काहीही बोलत नाही. लालूप्रसाद आणि राजद यांना दलित समुदायावर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. राजदने नेहमीच दलितांना त्रास दिला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत दलित आणि महादलित समुदाय आणि आंबेडकरांवर विश्वास ठेवणारे लोक राजद उमेदवारांना धडा शिकवतील.

विरोधकांकडून टीका होवू लागल्यानंतर आणि वाद वाढत असल्याचे दिसत असताना, राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बचाव केला आणि भाजपला एक मोठा खोटारडा पक्ष म्हटले. तेजस्वी म्हणाले, भाजपचा आंबेडकरांशी किंवा संविधानाशी काहीही संबंध नाही. लालू प्रसाद यांनी संपूर्ण बिहारमध्ये आंबेडकरांचे किती पुतळे बसवले आहेत. आम्ही आंबेडकरांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. भाजपचे लोक फक्त खोटा प्रचार करत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com