Uttar Pradesh Political News : राज्यात नुकताच फुटलेल्या खासदारांमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. याची चर्चा अद्याप थांबत नाही तोच विश्वासू सचिन अहिर यांनी शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची देशपातळीवर चर्चा रंगली आहे. तोच उत्तर प्रदेशाच्या राजकारणात देखील राजकीय भूकंप झाला आहे. येथे 111 आमदार असलेल्या समाजवादी पक्षाला धक्का बसला असून ज्येष्ठ नेते आमदार कमाल अख्तर यांनी राजीनामा दिला आहे. समाजवादी पक्ष येथे विरोधी पक्ष असून कमाल अख्तर विधीमंडळात 'मुख्य प्रतोद' होते.
साम टीव्हीच्या वृत्तानुसार देशात अनेक राज्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळत असून पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रानंतर आता उत्तर प्रदेशातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे देखील इतर राज्यांप्रमाणेच विरोधी पक्षातील आमदार खासदार सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच मुरादाबादमधील कांठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार कमाल अख्तर यांनी विधीमंडळातील मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अख्तर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या आदेशानंतरच आपण राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. पण त्यांच्यात आणि खासदार रुची वीरा यांच्यातील मतभेद ताणल्यानेच अख्तर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. पण हा वाद मिटावा यासाठी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये दोघांसोबत बैठक घेत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाही.
दरम्यान खासदार रुची वीरा आणि त्यांच्यातील वाद हा वाढला होता. तसेच येथे मुरादाबाद शाखेत बऱ्याच काळापासून गटबाजीला देखील उत आले होते. ज्यानंतर अख्तर यांनी याची कल्पना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना दिली. यानंतरच अखिलेश यादव यांनी दोन्ही नेत्यांना एकत्र करत बैठक घेतली होती.
या बैठकीत देखील वादावर पडदा पडला नव्हता तर दोन्ही नेत्यांनी अध्यक्षांच्या समोर एकमेकांच्या तक्रारींचा पाढा वाचला होता. पण आता अख्तर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे आपण राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. तर या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली असून समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.