Maharashtra Political Crisis : शिंदेंकडे जाणार की परतणार? ओमराजेंच्या सूचक वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, 'माझा संपर्क..?'

Aaditya Thackeray On Omraje Nimbalkar Shivsena Entry : पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले आहेत. यामुळे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. यामुळे सध्या गल्ली ते दिल्ली अशी शिंदेंची चर्चा होताना दिसत आहे.
operation tiger; Aaditya Thackeray and Omraje Nimbalkar
operation tiger; Aaditya Thackeray and Omraje Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडत राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. यामुळे सध्या राज्यात खळबळ उडाली असून याचे हादरे भाजपमध्ये जाणवू लागले आहेत. एकीकडे शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊपैकी सहा खासदार फोडत ऑपरेशन टायगर यशस्वी केल्याचं बोललं जात असतानाच खासदार ओम राजेनिंबाळकरांच्या विधानाने मात्र बंडखोर पाच खासदारांसह शिंदेंची धाकधूक वाढवली आहे.

ओमराजेंच्या भूमिकेनंतर शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ज्यांना परत यायचं आहे, त्याचं स्वागत आहे. उद्धव साहेबांचं मन मोठं आहे, अशी प्रतिक्रिया साम टीव्हीवर दिली आहे. यामुळे आता बंडखोर खासदारांना रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेवटची चाल खेळली जात असून आदित्य ठाकरेंनी भावनिक कार्ड खेळल्याचे दिसत आहे.

एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्याची चर्चा जोर धरत असतानाच शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचे वडिल पनवराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज (ता.२०) सीबीआय कोर्टाने दिला. यावेळी सीबीआयने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यामुळे ओमराजेंना मोठा धक्का बसला. तर ज्या निकालासाठी त्यांनी ठाकरेंशी गद्दारी केली. तोच त्यांच्या बाजूने न लागल्याने ते निराश झाल्याचे समोर आले.

operation tiger; Aaditya Thackeray and Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar : ओमराजेंच्या विरोधात निकाल, 'ऑपरेशन टायगर'नंतर मतदारसंघात परतणार? सगळंच अधांतरी, सुरक्षाही वाढवली

या निकालानंतर ओमराजेंनी नाराजी व्यक्त करताना, यानिकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगत शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावर भाष्य केलं. ते म्हणाले की, 'मी येत्या दोन दिवसातच धाराशिव मतदारसंघात जाणार आहे. त्यानंतर मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कार्यकर्त्यांचे मते जाणून घेणार आहे. यानंतरच भविष्याकाळातील राजकीय वाटचालीविषयी अंतिम निर्णय घेणार.

यानंतर आता बंडखोर पाच खासदारांसह शिंदेंची धाकधूक वाढवल्याची चर्चा राज्यभर होताना दिसत आहे. अशातच आदित्य ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पक्षातील संभाव्य बंडखोरीला ब्रेक लावण्यासाठी आता थेट भावनिक कार्ड खेळले आहे. आदित्य ठाकरेंनी, ज्यांना पक्षात परत यायचे असेल त्यांनी परत यावे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन खूप मोठे आहे. त्यांना ते नक्कीच माफ करतील, असे म्हटले आहे.

तसेच यावेळी जे पक्षात येणार नाहीत. जे गद्दारी करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असाही कडक इशारा दिला आहे. एकीकडे इतर पाच बंडखोर खासदारांबाबत कसलीच चर्चा नसताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या या निर्णयाने राज्यात संताप व्यक्त केला आज असून आज कोर्टात देखील त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर आदित्य ठाकरे यांना विचारले असता, त्यांनी या संपूर्ण प्रकरणात ओमराजे यांच्याशी आपला सध्या कोणताही संपर्क झालेला नाही, मी तर भेटत नाही असे ते म्हणतात, असाही टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असो पण डुबायला नको हे त्यांच्यावर आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी ओमराजेंना पुन्हा एकदा घरवापसी करण्याची ऑफर देत शिवसेनेचे दारं उघडी असल्याचे म्हटलं आहे.

operation tiger; Aaditya Thackeray and Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरेंचा हात सोडताच ओमराजेंना मोठा धक्का! हजारो फॉलोअर्सनी केलं अनफॉलो

याचवेळी कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना एकच आहे, ती एकनाथ शिंदेंची, असे म्हणत अमित शाहांनी डिवचल्यावरून देखील आदित्य ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मित शाहांच्या स्वागतासाठी गुलामांनी बॅनर लावले. यामुळे असल्या फालतू गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही, जे काही घडत आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे, शिवसेना कोणाची आहे. ज्या लोकांना माझ्या आजोबांनी वाचवलं, तेच आज शिवसेना आणि ठाकरे कुटुंब संपवायला निघालेत. हे सुद्धा जनता आणि जग बघत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com