Uttar Pradesh News : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यामधील राजकीय वैर दिवसागणिक वाढत चालले आहे. ना लोकसभा ना विधानसभा, कुठल्याही निवडणुकीत हे दोन पक्ष आघाडी तर सोडाच पण नेतेही समोरासमोर यायला तयार नाहीत. 2019 मध्ये दोन्ही पक्षांच्या आघाडीवर शेवटचा घाव घालण्यात आला होता.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांच्या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतरच दोन्ही पक्षांमधील दरी वाढत गेली आणि आघाडी तुटली. मायावतींनी ही आघाडी तुटण्यामागचे खरे कारण सांगितले आहे.
बसपकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एका पुस्तिकेचे वाटप केले जात आहे. त्यामध्ये मायावतींनी म्हटले आहे की, 2019 मध्ये सपा-बसपाची आघाडी तुटली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपले फोन उचलने बंद केले होते. या कारणाने आघाडी तोडावी लागल्याचे मायावतींनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशात दोन वर्षांपूर्वी झालेली विधानसभा आणि यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर राहिले. याचा सर्वाधिक फटका मायावतींना बसला. लोकसभेत काँग्रेस आणि सपाने आघाडी केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र, मायावतींनी एकला चलोची भूमिका घेतली आहे.
2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मायावतींनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांच्याकडून टीम तयार केली जात आहे. त्याआधी त्यांनी सपा आणि बसपामधील आघाडी तुटण्याचे कारण सांगताना अखिलेश यांच्यावर थेट आरोप केला आहे.
दोन्ही पक्षांनी एकत्रित लढलेल्या 2019 च्या निवडणुकीत सपाने 37 तर बसपाने 38 जागांवर उमेदवार उतरवले होते. तर अमेठी व रायबरेली या दोन जागा काँग्रेससाठी सोडल्या होत्या. या निवडणुकीत सपाला केवळ पाच जागा तर बसपला दहा जागा मिळाल्या होत्या. अखिलेश यांना केवळ पाचच जागा मिळाल्याने त्यांनी फोन उचलने बंद केल्याचा दावा मायावतींनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.