Sharad Pawar Video : झेड प्लस सुरक्षा प्रकरणी शरद पवारांनी पुन्हा केंद्र सरकारसमोर ठेवल्या 'या' अटी आणि शर्ती

Sharad Pawar On Z Plus Security : शरद पवारांना देण्यात येणाऱ्या केंद्रीय सुरक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुरक्षा घेण्याआधी पवारांनी केंद्रापुढे काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. शहराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत शरद पवारांच्या प्रतिनिधींची दिल्ली येथे बैठक झाल्याचं समोर आलं आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 12 Sep : केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सुरक्षा घेण्यापूर्वी शरद पवार यांनी केंद्र सरकार पुढे काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत.

त्या मान्य केल्या तरच सुरक्षा घेण्याचा विचार करू असं पवार यांनी केंद्र सरकारला पत्राद्वारे कळवल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.

यामध्ये सीआरपीएफचे 58 कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार होते. मात्र, आपणाला अतिरिक्त सुरक्षेची गरज नसल्याचं पवार यांनी त्यावेळी देखील म्हटलं होतं. तसेच शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्र सरकार आपणाला ही सुरक्षा का देत आहेत? मला कोणत्या प्रकारचा धोका आहे? याची चौकशी करू आणि त्यानंतरच सुरक्षा घेण्याचा विचार करू, असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होत.

Sharad Pawar
Sanket Bawankule: लाहोरी बारमधील 'बीफ' राऊतांना 1हजार 1कोटींना पडणार?

दरम्यान, आता शरद पवारांना देण्यात येणाऱ्या केंद्रीय सुरक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुरक्षा घेण्याआधी पवारांनी केंद्रापुढे काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. शहराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत शरद पवारांच्या प्रतिनिधींची दिल्ली येथे बैठक झाल्याचं समोर आलं आहे. या बैठकीत सुरक्षितेबाबत चर्चा करण्यात आली तसेच सुरक्षा स्वीकारण्यापूर्वी काही अटी मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी केंद्राच्या सुरक्षेआधी जे राज्याचे सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत ते तसेच रहावेत अशी मागणी केली आहे. तसेच कार्यालयात आणि निवासस्थानामध्ये केंद्राच्या सुरक्षा रक्षकांना प्रवेश नसावा, प्रवासादरम्यान खाजगी गाडीमध्ये सुरक्षा कर्मचारी नसावेत, अशा अटी पवारांनी ठेवल्या आहेत.

Sharad Pawar
Shivsena : यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप, शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठी खेळी, लोकसभेतील चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न!

याबाबतचे पत्र त्यांनी केंद्र सरकारला (Central Government) पाठवले असून असून या सर्व अटींवरती सकारात्मक निर्णय झाला तरच आपण केंद्राची झेड प्लस सुरक्षा घेण्याबाबत सकारात्मक विचार करू असंही या पत्रातून नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता यावर केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com