alcohol drink | Maharashtra  Sarkarnama
देश

मद्यराष्ट्र म्हणणाऱ्यांना चपराक; महाराष्ट्रापेक्षा भाजपशासित राज्यचं मद्यसेवनात आघाडीवर

Maharashtra | Mahavikas aaghadi : टीका करणाऱ्या विरोधकांना चपराक देणारी आकडेवारी समोर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोना काळात राज्यातील मंदिर उघडण्यापूर्वी दारुची दुकाने उघडल्यामुळे किंवा मागील काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीला सुपर मार्केटमध्ये परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर महाराष्ट्राला मद्यराष्ट्र केल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र हीच टीका करणाऱ्या विरोधकांना आता चपराक देणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रापेक्षा भाजपशासित राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर दारुचे सेवन केले जात असल्याचे उघड झाले आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तामध्ये नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-5 नुसार, २०१९-२०२१ या काळात महाराष्ट्रात केवळ १३.९ टक्के पुरुष दारुचे सेवन केले असल्याचे समोर आले आहे. तर महिलांमध्ये देखील महाराष्ट्राचा नंबर सर्वात कमी सेवन करणाऱ्या महिलांच्या गटामध्ये लागतो. पुरुषांमध्ये सर्वात जास्त दारुचे सेवन करणाऱ्या राज्यांमध्ये पहिला नंबर लागला तो भाजपशासित अरुणाचल प्रदेशचा. अरुणाचल प्रदेशमध्ये तब्बल ५२ टक्के पुरुष दारुचे सेवन करत आहेत. त्यानंतर पुरुषांच्या दारु सेवनाबाबत तेलंगणा - ४३.०४ टक्के , सिक्कीम - ३९.०४ टक्के, अंदमान आणि निकोबार बेट - ३८.०८ टक्के , मणिपूर - ३७.०२ टक्के , गोवा - ३६.०८ टक्के , छत्तीसगड - ३४.०७ टक्के या राज्यांचा नंबर लागतो.

पुरुशांमध्ये सर्वात कमी मद्यसेवन करणाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्राचा नंबर ५ वा आहे. देशात सर्वात कमी दारुचे सेवन म्हणजे अगदीच ०.४ टक्के लक्षद्वीपमधील पुरुष करतात. त्याखालोखाल गुजरात - ५.०८ टक्के, जम्मू-काश्मिर - ८.०७ टक्के, राजस्थान ११.०० टक्के, महाराष्ट्र - १३.०९ टक्के तर उत्तरप्रदेश १४.५ टक्के पुरुष दारुचे सेवन करतात. विषेश म्हणजे गुजरातमध्ये दारुबंदी असून देखील ५.०८ टक्के पुरुष दारुचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. तर महाराष्टाचा नंबर संपूर्ण भारतात सर्वात कमी मद्य सेवन करणाऱ्या राज्यांमध्ये आहे.

महिलांच्या दारुसेवनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर सर्वात कमी या गटात लागतो. महिलांमध्ये दारुचे सेवन करण्यासाठी देखील अरुणाचल प्रदेशचाच पहिला नंबर लागतो. अरुणाचल प्रदेशमध्ये - २४.०२ टक्के महिला दारुचे सेवन करतात. त्यानंतर सिक्कीममध्ये - १६.०२ टक्के महिला, आसाममध्ये - ७.०३ टक्के महिला, तेलंगणामध्ये - ६.०७ टक्के महिला, झारखंडमध्ये - ६.०७ टक्के महिला, अंदमान आणि निकोबार बेट - ५ टक्के, छत्तीसगड -४.०९ टक्के महिला दारुचे सेवन करतात. तर सर्वात कमी दारुचे सेवन म्हणजे केवळ ०.२ टक्के केरळमधील महिला दारुचे सेवन करतात. त्यानंतर जम्मू काश्मिरमध्ये ०.२ टक्के, ९ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशामध्ये ०.३ टक्के महिला दारुचे सेवन करतात. याच गटात महाराष्ट्राचा देखील नंबर लागतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT