माजी न्यायमंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचे निधन

Hussain Dalwai : कोकण कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी त्यांनी परिश्रम घेतले होते
Hussain Dalwai
Hussain Dalwai Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई - जेष्ठ कायदेतज्ञ, गांधीवादी नेते आणि काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री अॅड. हुसेन दलवाई यांचे (Hussain Dalwai) मुंबईत (Mumbai) निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. चर्चगेट इथल्या इम्प्रेस कोर्ट निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यांच्या पश्चात मोठा मुलगा दिलावर, फिरोज, मुश्ताक आणि रेहाना, शहनाज या दोन मुली आहेत. याशिवाय काँग्रेसचे सध्याचे खासदार हुसेन दलवाई यांचे ते चुलत भाऊ होते. अॅड. दलवाई यांनी १६ वर्षे विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात ते कायदे मंत्री राहीले. (Husain dalwai death news)

हुसेन दलवाई यांचा जन्म १७ ऑगस्ट १९२२ मध्ये चिपळूण तालुक्यातील मिरोली गावात झाला. शहरातील युनायटेड हायस्कूलमध्ये त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यापुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. त्यांनी कायद्याची पदवीही घेतली होती. बीए. एलएलबीचे शिक्षण चालू असतानाच त्यांचा संबंध राष्ट्र सेवा दलासोबत आला. १९४० ते १९४६ या कालावधीत त्यांनी राष्ट्र सेवा दलासोबत काम केले. त्यानंतर १९५२ पासून त्यांनी स्वतःला काँग्रेस पक्षाशी आणि काँग्रेस विचारधारेसोबत जोडून घेतले.

Hussain Dalwai
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात : थोडक्यात बचावले

या दरम्यान अॅड. दलवाई यांनी अनेक दशके मुंबई उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९६२ साली खेड तालुक्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली व ते आमदार झाले. राज्यात याच काळात त्यांनी न्यायमंत्री म्हणून काम पाहिले. १९८४ मध्ये राज्यसभेवर ते खासदार म्हणून निवडून गेले. तेव्हाच ते लोकसभेवरही निवडून गेले होते.

दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी त्यांनी परिश्रम घेतले होते. याशिवाय येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. ‘डीबीजे’ महाविद्यालयाच्या वाटचालीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Hussain Dalwai
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्र भाजपमधूनच विरोध; थेट राजनाथसिंहांकडं धाव

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ट संबंध होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह देखील त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानशी त्यांचा निकटचा संबंध होता. एका समाजवादी व काँग्रेसी विचारांच्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनामुळे सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com