BJP leader honey trap plot exposed: उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये भाजप नेत्याला कथित हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपचे महानगर मीडिया प्रभारी निधीश कांत भट्ट यांना एका महिलेने फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला.
त्यानंतर फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना एका ठिकाणी बोलावून त्यांचा कथित आपत्तिजनक व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बन्नादेवी पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे.
ही घटना 30 जुलै रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. निधीश कांत भट्ट यांच्या तक्रारीनंतर बन्नादेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, फेसबुक मेसेंजरवर एका महिलेची त्यांच्याशी ओळख झाली होती. संबंधित महिलेने फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना क्वार्सी परिसरातील स्वर्ण जयंती नगर येथे बोलावल्याचा आरोप आहे.
तिथे कट रचून त्यांना नशेचे पदार्थ देण्यात आले. त्यानंतर नशेच्या अवस्थेत त्यांचे कथित आपत्तिजनक फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यांच्या सोन्याची अंगठी, चेन आणि 12 हजार रुपये घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कथित व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू झाल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, सुरुवातीला 2 लाख रुपये घेतल्यानंतर आणखी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी श्रवण कुमार आणि त्याची पत्नी काजल देवी यांना अटक केली. पोलिसांच्या चौकशीत काजलने 'पूजा कुमारी' या नावाने फेसबुक आयडी तयार करून दिल्याची माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून लोकांना कथितरित्या जाळ्यात ओढून पैसे उकळण्याची योजना असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
बन्नादेवी पोलिसांनी आरोपींकडून 2 मोबाइल फोन, 4 मोबाइल फोनचे बॉक्स आणि 7 आधार कार्ड जप्त केल्याचे सांगितले आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, एका POCO मोबाइलमध्ये तक्रारदाराशी संबंधित 9 कथित व्हिडिओ आढळले आहेत.
या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे अलीगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजप नेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याच्या या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जातो, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.